ITBP Recruitment 2022: तुम्ही जर 10वी पास (10th pass) असाल आणि सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असाल तर तुम्हाला इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (Indo Tibetan Border Police Force) (ITBP) मध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (Constable) (पायनियर) पदासाठी अर्ज मागवले आहेत. ITBP ने कॉन्स्टेबल (पायनियर) च्या 108 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 56 कॉन्स्टेबल (सुतार), 31 कॉन्स्टेबल (मेसन) आणि 21 कॉन्स्टेबल (प्लंबर) पदे भरली जाणार आहेत.
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल (पायनियर) पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन 17 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन नोकरीचा अर्ज करू शकता.
Read Also : या कारणांमुळे बायको नवऱ्यांबरोबर करते कट-कट
कॉन्स्टेबल (पायनियर) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 10वी पास असावा. याशिवाय, उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI मधून मेसन, कारपेंटर किंवा प्लंबरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला असावा. या पदांच्या भरतीसाठी अर्जदारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. या पदांसाठी 21700-69100 रुपये वेतन निश्चित करण्यात आले असून सर्व भत्त्यांसह सुरुवातीचे वेतन सुमारे 40 हजार रुपये असू शकते.
Read Also : ऐनवेळेस इंदुरीकर महाराजांनी रद्द केलं किर्तन; खर्च झाला वाया
मेसन, कारपेंटर आणि प्लंबरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. या पदांवरील निवड शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल.
Read Also : शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा बोगदा सुरक्षा दलाकडून उद्ध्वस्त
या पदांच्या भरतीसाठी, सर्वप्रथम, ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in पोर्टलवर जा आणि नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि फॉर्मची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.