Job Opportunities For Tenth Pass Youth : मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सरकारी पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरीसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेले तरुण तरुणी पण अर्ज करू शकतात.
कर्मचारी राज्य विमा निगम, ESIC मध्ये अप्पर डिव्हिजन क्लार्क, मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर पदांसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार esic.nic.in या वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पाठवू शकतात.
नवोदय विद्यालय समितीने दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांपर्यंत गट A, B आणि C पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत navodaya.gov.in वर जाऊन अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात.
सीमा सुरक्षा दल अर्थात BSF ने २७८८ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दोन वर्षांचा अनुभव आणि दहावी उत्तीर्ण अथवा ITI मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा केलेले तरुण १ मार्च २०२२ पर्यंत https://rectt.bsf.gov.in/ वर जाऊन अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात.