IAF Group C Recruitment 2022: नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायू दलातील ग्रुप सी श्रेणी (Indian Air Force Group C Recruitment)पदांसाठी भरती होणार आहे प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीद्वारे अनेक पदांवर (Air Force Jobs) उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. तुम्ही या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकता. ही भरती (Sarkari Naukri 2022) प्रक्रिया मेंटेनन्स कमांड हेडक्वार्टर आणि वेस्टर्म एअर कमांड हेडक्वार्टरसाठी राबवली जात आहे. या भरतीसाठी पोस्टाद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एअरक्रॉफ्ट मेकॅनिक
कारपेंटर स्किल्ड
कुक
लोअर डिव्हिजन क्लर्क
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपार्ट ड्राइवर
स्टेनो ग्रेड II
स्टोरकीपर
मेस स्टाफ
एमटीएस
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने एअरक्राफ्ट मेकॅनिक ट्रेडमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव किंवा माजी सैनिकासह एअरफ्रेम फिटर ट्रेडमधील दोन वर्षांचा अनुभव असावा.
10वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांनी कारपेंटर ट्रेडमध्ये ITI केलेला असावा.
कुक- या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच कॅटरिंगमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमासह एक वर्षाचा अनुभवही असावा.
या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे हलकी आणि जड वाहने चालवण्याचा परवाना असावा. मोटर मेकॅनिझमचे ज्ञान आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.+
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12वी पास असावा. तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंगचा वेग 35 शब्द आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट असावा.स्टेनो ग्रेड II- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12वी पास असावा. तसेच डिटेक्शन: 10mts@80 शब्द प्रति मिनिट असावे. संगणकावर ट्रांसक्रिप्शन- 50MTS@ (इंग्रजी), 65MTS हिंदी प्रति मिनिट असणे आवश्यक.
या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
या भरती परीक्षेसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना हिंदी/इंग्रजीमध्ये अर्ज टाईप करावा लागेल आणि तो लेटेस्ट अटेस्टेड पासपोर्ट फोटोसह पाठवावा लागेल. अर्जासोबत मागवलेल्या कागदपत्रांच्या अटेस्टेड फोटोकॉपी देखील पाठवाव्या लागतील. याशिवाय तुमच्या पत्ता लिहिलेला लिफाफा 10 रुपयांच्या तिकिटासह पाठवायचा आहे.