दहावी, बारावी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी

Job opportunity in Indian Army for 10th, 12th passers : भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडने ग्रुप सी पदांची भरती सुरू केली आहे.

Job opportunity in Indian Army for 10th, 12th passers
दहावी, बारावी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहावी, बारावी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी
  • अर्ज hqscrecruitment.com वर ऑनलाईन करता येईल
  • इच्छुक उमेदवार १९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करू शकतील

Job opportunity in Indian Army for 10th, 12th passers : भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडने ग्रुप सी पदांची भरती सुरू केली आहे. लष्कराने २० जून २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, स्टेनो ग्रेड २, एलडीसी, कुक, एमटीएस (दफ्त्री), एमटीएस (मेसेंजर), एमटीएस (सफाईवाला) आणि एमटीएस (चौकीदार) अशा एकूण ३२ जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज hqscrecruitment.com वर ऑनलाईन करता येईल. इच्छुक उमेदवार १९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करू शकतील. 

  1. स्टेनो ग्रेड २ – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याला इंग्रजी ते हिंदी भाषांतर येणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे टायपिंगचा स्पीड असणेही गरजेचे आहे.
  2. एलडीसी - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. कॉम्प्युटरवर इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टाईपिंगचा वेग असावा.
  3. कुक- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. त्याला भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  4. MTS (Daftri) - एमटीएस दफ्तरी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असावा.
  5. MTS (मेसेंजर) - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असावा.
  6. MTS (सफाईवाला) - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा.संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असावा.
  7. एमटीएस (चौकीदार) - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा.संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असावा.

अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी/एसटी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत, यूआरसाठी ३५ वर्षे, ओबीसीसाठी ३८ वर्षे आणि एससी/एसटीसाठी ४० वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. आर्मी सदर्न कमांड ग्रुप सी भरती २०२२ वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी