फ्रेशर्स आहात नो टेन्शन! देशातील 'ही' सर्वात मोठी कंपनी, यावर्षी करणार ४०,००० पेक्षा जास्त फ्रेशर्सची भरती

TCS hiring plan: टीसीएसमध्ये सध्या ५ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. टीसीएस (TCS) (Tata Consultancy Services)चालू आर्थिक वर्षात ४०,००० पेक्षा जास्त फ्रेशर्सची (TCS hiring Freshers) भरती करणार आहे.

TCS hiring plan
टीसीएसमध्ये फ्रेशर्सना संधी 
थोडं पण कामाचं
  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करणार ४०,००० फ्रेशर्सीची भरती
  • कोरोनाच्या संकटातही नोकरभरतीत अडचण नाही
  • पहिल्या तिमाहीत टीसीएसने कमावला ९,००८ कोटी रुपयांचा दणदणीत नफा

मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस (TCS) (Tata Consultancy Services)चालू आर्थिक वर्षात ४०,००० पेक्षा जास्त फ्रेशर्सची (TCS hiring Freshers) भरती करणार आहे. टीसीएस कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून फ्रेशर्सची भरती (Opportunity for Freshers) करणार आहे. कंपनीकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बाजारमूल्यानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार टीसीएस ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. टीसीएसमध्ये सध्या ५ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. मागील वर्षीदेखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ४०,००० फ्रेशर्सची कॅम्पसद्वारे (Job Opportunity) भरती केली होती. टीसीएसचे ग्लोबल ह्युमन रिसोर्स प्रमुख मिलिंद लक्कड यांनी म्हटले आहे की यावर्षी कंपनी आणखी जास्त नोकरभरती (TCS hiring plan) करणार आहे. (TCS, biggest recruiter  in India, to hire more than 40,000 freshers this year)

कोरोनाच्या संकटातदेखील नोकरभरतीत अडचण नाही

टीसीएसचे मिलिंद लक्कड म्हणाले की कोरोना महामारीसारखे संकट असतानादेखील नोकरभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मागील वर्षी नोकरभरतीच्या प्रक्रियेत एकूण ३.६० लाख फ्रेशर्स सहभागी झाले होते. इतक्या उमेदवारांची व्हर्च्युअल मुलाखत घेण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की कॉलेज कॅम्पसमध्ये मागील वर्षीदेखील आम्ही ४०,००० फ्रेशर्सची नोकरभरती केली होती आणि यावर्षीदेखील इतक्याच फ्रेशर्सची नोकरभरती केली जाणार आहे.

नोकरभरतीची प्रक्रिया लांबलचक

लक्कड पुढे म्हणाले की नोकरभरतीची प्रक्रिया खूप लांबलचक असते. कंपनीला एखादा प्रोजेक्ट मिळाल्यावरच कंपनी नोकरभरती सुरू करते असे नाही. जर एखाद्या उमेदवाराची निवड झाली तर निवड झाल्यानंतर किमान तीन महिन्यानंतरच  तो पोजेक्टमध्ये काम करण्यास सुरूवात करतो. टीसीएसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असलेल्या एन गणपति सुब्रमण्यम यांनी सांगितले की आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता नाही. मात्र त्याचबरोबर त्यांनी कॉस्टिंगचा मुद्दाही फेटाळून लावला.

टीसीएसच्या नफ्यात जबरदस्त वाढ

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसला चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीत दणदणीत नफा झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा २८.५ टक्क्यांनी वाढून ९,००८ कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ७,००८ कोटी रुपये इतका होता. कंपनीचा महसूलदेखील १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत टीसीएसला ३८,३२२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

२०,००० पेक्षा जास्त लोकांना दिला जॉब

कोरोनासारख्या संकटकाळातदेखील टीसीएसने २०,४०९ नव्या कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढून पाच लाखांच्यावर म्हणजेच ५,०९,०५८वर पोचली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी म्हटले आहे की कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांची मदत करण्यासंदर्भात, समाजाची मदत करण्यात आणि ग्राहकांसाठीची कटिबद्धता दाखवण्यासंदर्भात मोठे चारित्र्य दाखवले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी