मराठमोळ्या तरुणांना मोठी संधी, राज्यात ३,४५० पदांसाठी मोठी पोलीस भरती

Maharashtra Police Recruitment 2019: राज्यात एक मोठी पोलीस भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यात किती पदांसाठी भरती होत आहे.

Maharashtra Police Recruitment 2019
प्रातिनिधीक फोटो   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मराठमोळ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी
 • महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३,४५० पदांसाठी भरती
 • भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित करा अर्ज

मुंबई: नोकरीच्या शोधात असणाऱ्या मराठमोळ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३,४५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या सर्व जागा पोलीस शिपाई पदाच्या आहेत. विविध जिल्ह्यानुसार ही पोलीस भरती होत आहे. जाणून घ्या या पोलीस भरती संदर्भातील सविस्तर माहिती.

महत्वाच्या तारखा: 

 1. अर्ज करण्याची सुरूवात - ३ सप्टेंबर २०१९ 
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २३ सप्टेंबर २०१९ 
 3. परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख - २३ सप्टेंबर २०१९ 

कुठल्या विभागात किती पदांसाठी भरती

 1. बृहन्मुंबई - १०७६
 2. ठाणे शहर - १००
 3. पुणे शहर - २१४ 
 4. पिंपरी-चिंचवड - ७२० 
 5. नागपूर शहर - २७१ 
 6. नवी मुंबई - ६१ 
 7. औरंगाबाद शहर - १५ 
 8. सोलापूर शहर - ६७ 
 9. लोहमार्ग मुंबई - ६० 
 10. रायगड - ८१ 
 11. पालघर - ६१ 
 12. सिंधुदूर्ग - २१ 
 13. रत्नागिरी - ६६ 
 14. जळगाव - १२८ 
 15. धुळे - १६ 
 16. नंदूरबार - २५ 
 17. कोल्हापूर - ७८ 
 18. पुणे ग्रामीण - २१ 
 19. सातारा - ५८ 
 20. सांगली - १०५ 
 21. जालना - १४ 
 22. भंडारा - २२ 
 23. लोहमार्ग पुणे - ७७
 24. कारागृह औरंगाबाद विभाग - ७६ 
 25. कारागृह नागपूर विभाग - १७ 

वयोमर्यादा 

 1. खुला प्रवर्ग - १८ वर्षे ते २८ वर्षे 
 2. मागास प्रवर्ग - १८ वर्षे ते ३३ वर्षे
 3. प्रकल्पग्रस्त उमेदवार - १८ वर्षे ते ४५ वर्षे 
 4. भूकंपग्रस्त उमेदवार - १८ वर्षे ते ४५ वर्षे 
 5. माजी सैनिक उमेदवार - १८ वर्षे ते उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे
 6. अनाथ - १८ वर्षे ते २८ वर्षे 
 7. पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवार - १८ वर्षे ते ५५ वर्षे 

शैक्षणिक अर्हता - उमेदवार हा १२वी पास असावा

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराने mahapariksha.gov.in या वेबसाईवर भरती संदर्भातील सविस्तर माहिती मिळेल. यासोबतच पोलीस विभागाच्या www.mahapolice.gov.in या वेबसाईटवरही सव्सितर जाहिरात पहायला मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...