Arogya Vibhag Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई मनपा अंतर्गत रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या पद आणि पगार किती मिळेल

Government of Maharashtra Public Health Department: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त असलेल्या पदांवर भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Maharashtra public health department arogya vibhag bahrati 2023 apply for various post check details on arogya maharashtra gov in portal mcgm gov in
Arogya Vibhag Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई मनपा अंतर्गत रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या पद आणि पगार किती मिळेल (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकरिता राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावे

Arogya Vibhag recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकरिता राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी निव्वळ कंत्राटी स्वरूपात आणि करार पद्धतीने मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर 2, ठाणे (प) 400604 येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत.

कुठे आणि कोणत्या पदासाठी भरती

मुंबई मनपा मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था (NTEP) कार्यक्रम

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र) Medical Officer District TB Center 

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 70 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 60,000 रुपये

हे पण वाचा : दररोज एक संत्री खायला हवी का?

पदाचे नाव - वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 20,000 रुपये

पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 17,000 रुपये

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

पदाचे नाव - टी. बी. हेल्थ व्हीजीटर (TB Health Visitor)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 15,500 रुपये

पदाचे नाव - सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 40,000 रुपये

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् घोरण्याची समस्या करा दूर

पदाचे नाव - वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 25,000 रुपये

पदाचे नाव - औषध निर्माता (Pharmascist)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 17,000 रुपये

हे पण वाचा : कॉफी पिण्याचे शरीराला होतात असंख्य फायदे

पदाचे नाव - पी. पी. एम. समन्वयक (PPM Co-ordinater)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 20,000 रुपये

पदाचे नाव - समुपदेशक (Counsellor)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 17,000 रुपये

हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या

पदाचे नाव - सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)

 1. महानगरपालिकेचे नाव - मुंबई महानगरपालिका
 2. वयोमर्यादा - उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
 3. एकत्रित मानधन - 17,000 रुपये

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरीता जाहिरात www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.inhttps://portal.mcgm.gov.in/ या वेबसाईट्सवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Arogya Vibhag Recruitment PDF notification

भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी https://portal.mcgm.gov.in या लिंकवर क्लिक करा. 

या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात वाचूनच मग आपला अर्ज सादर करावा. भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक अर्हता आणि अर्ज करण्याची पद्धत या संदर्भातील सविस्तर माहिती व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतरच आपला अर्ज दाखल करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी