महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अॅप्रेंटिस पदाच्या १५८ जागांसाठी भरती

Mahatransco Recruitment 2021 for Apprentice posts: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अॅप्रेंटिस पदाच्या १५८ जागांसाठी शिकाऊ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

Mahatransco Recruitment 2021
(फोटो सौजन्य: mahatransco.in) 

Mahatransco Recruitment 2021 for Apprentice 158 posts: औद्योगित प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कळवा मंडळ आणि नाशिक विभागात एकूण १५८ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

कळवा मंडळात ९४ पदे

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कळवा अंतर्गत वर्ष २०२१-२२ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता २४ मार्च २०२१ ते १० एप्रिल २०२१ पर्यंत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

नाव - अउदा. संवसु. मंडळ, कळवा 

आस्थापना नोंदणी क्रमांक - E10162701237 

वीजतंत्री पद - ९४ 

शैक्षणिक अर्हता - 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 

राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

उमेदवारांनी संकेत स्थळावर Online Registration (http://www.apprenticeshipindia.org)ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेला अर्ज भरुन त्यासोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दिनांक १७.०४.२०२१ पर्यंत अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा.संवसु. मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८ या पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहोचेल या बेताने पाठवावे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कळवा मंडळा अंतर्गत अॅप्रेंटिस पदासाठीचा आवश्यक अर्ज पाहण्यासाठी www.mahatransco.in या लिंकवर क्लिक करा. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. 

नाशिक विभागात ६४ पदे

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदा संवसु मंडळ, नाशिक कार्यालयांतर्गत अउदा संवसु विभाग नाशिक येथे सन २०२१ ते २०२२ च्या कालावधीसाठी शिकाऊ (Apprentice) उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. 

शैक्षणिक पात्रता - 

१०वी पास व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय. वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी खउल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.

अर्जदाराने शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

अर्जदाराने दिनांक २२ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ कालावधीत https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/60472676f6f9d729b6758381 या लिंकवरुन अल्पाय करताना सर्व माहिती भरुन आवश्यक कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नाशिक विभागा अंतर्गत अॅप्रेंटिस पदासाठीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी www.mahatransco.in  या लिंकवर क्लिक करा. उमेदारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी