Maharasthtra State Electricity Transmission Co. LTD Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजेच महापारेषण अंतर्गत रिक्त पदे भरण्यात येत आहेत. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. जाणून घेऊयात या संदर्भात अधिक माहिती....
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, अउदा. संवसु. मंडळ, कळवा अंतर्गत वर्ष 2022 - 23 करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर शिकाऊ उमेदवारीसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. याची अधिकृत जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी Mahatransco Recruitment notification pdf या लिंकवर क्लिक करा.
कार्यालयाचे नाव | आस्थापना नोंदणी क्रमांक | वीजतंत्री |
अधीक्षक अभियंता, अउदा. संवसु. मंडळ, कळवा | E10162701237* | 62 |
कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, बोईसर | E11222700108** | 25 |
टिप - ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
हे पण वाचा : ही लक्षणे दिसल्यास समजून जा तुम्हाला लिव्हरची समस्या आहे
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा
हे पण वाचा : मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होते?
वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न करणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्षे (मागास वर्गीयांसाठी 5 वर्षे शिथिलक्षम)
उमेदवारांनी संकेत स्थळावर Online Registration (http//www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेला अर्ज भरुन त्यासोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुण पत्रिका, प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र 1 मार्च 2023 पर्यंत खालील कार्यालयीन पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.
अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, कळवा
महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400708
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर,
खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा पालघर - 401501