MHA CEPI Recruitment 2022: नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता थेट केंद्रीय गृह मंत्रालयात (Union Home Ministry) नोकरी मिळण्याची संधी दाराशी आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारत-CEPI साठी कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टीमध्ये विविध पदांसाठी भरती (MHA CEPI Recruitment 2022) करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ही भरती नवी दिल्लीतील मुख्यालय (Delhi Head Office), मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि लखनऊ (Lucknow) येथील शाखा कार्यालयांमध्ये केली जाईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत कायदा अधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार आणि सर्वेक्षक ही पदं भरली जाणार आहे. एकूण 42 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. CEPI च्या आवश्यकतेनुसार आणि उमेदवाराच्या कामगिरीनुसार नोकरीचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढविला जाऊ शकतो.
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. यासाठी, गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट, mha.gov.in वर जाऊन किंवा CEPI च्या अधिकृत वेबसाइट, enemerproperty.mha.gov.in च्या रिक्रूटमेंट विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊन फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो. हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. यानंतर, फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर, तो स्कॅन करा. ईमेलला स्कॅन केलेली प्रत संलग्न करा आणि ती cepi.del@mha.gov.in या आयडीवर मेल करा. मात्र, उमेदवारांसाठी ऑफलाइन मोडचा पर्यायही देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत परिपत्रकात दिलेल्या पत्त्यावर 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म जमा करता येईल. सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे आहे.