MPSC recruitment 2023 maharashtra lokseva aayog bharati new notification pdf: एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वीच मेगाभरती जाहीर केली आणि त्यासंदर्भात नोटिफिकेशन सुद्धा काढण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, आता या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीने नवीन नोटिफिकेशन काढलं आहे. यानुसार अर्ज सादर करण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 01/2023, दिनांक 20 जानेवारी 2023 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदवाढ देण्यात येत आहे.
विहित पद्धतीने अर्ज सादर करुन ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही. तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी 2023 आणि 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान
हे पण वाचा : धीरेंद्र शास्त्री आणि बागेश्वर धामचा पैसा येतो कुठून?