MPSC Bharati 2023 latest updates: एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्या विभागात, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल आणि वेतनश्रेणी किती असेल या संदर्भात जाणून घेऊयात... (MPSC Recruitment 2023 apply online for mpsc bharati various posts check department salary details mpsc.gov.in)
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - 2023
शनिवार, दिनांक 2 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023
शनिवार, दिनांक 9 सप्टेंबर 2023
या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील पदसंख्या, आरक्षणाच्या संदर्भातील तरतुदी, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक अर्हता, निवडप्रक्रिया, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिकृत आणि सविस्तर जाहिरातीसाठी https://mpsc.gov.in/downloadFile/english/6609 या लिंकवर क्लिक करा.
अर्ज सादर करण्यासाठी MPSC Website - https://mpsc.gov.in/
अर्ज सादर करण्याचा कालावधी - दिनांक 25 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 11.59 वाजेपर्यंत.
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत..
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक - दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेच्या कार्यालयनीन वेळेत.