Mumbai Metro Bharti :मराठी तरूणांसाठी मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी, होणार मेगा भरती 

जॉब पाहिजे
Updated Sep 11, 2019 | 16:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Metro Recruitment 2019, Mumbai Metro Bharti : मुंबई मेट्रोमध्ये एक हजार ५३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी कायस्वरुपी स्वरुपाची असणार आहे

mumbai metro
मुंबई मेट्रोमध्ये मेगाभरती 

मुंबई मेट्रो भरती २०१९ : मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारत आहे, त्यामुळे आता या ठिकाणी नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. मुंबई मेट्रोचे विविध टप्पे येत्या काही वर्षात कार्यात्वीत होणार आहेत तर काही नवे मेट्रो मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोमध्ये १ हजार ५३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी कायम स्वरू असणार असून सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येणार आहे. 

मुंबई मेट्रोमध्ये कायमस्वरूपी नोकरीची मराठी मुलांना संधी आहे. त्यामुळे त्यांनी www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. येत्या १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याचे शुल्क हे ओपन वर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये तर रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी १५० रुपये असणार आहे. या प्रक्रियेत निवड झाल्यास उमेदवारांना पदानुसार सातव्या वेतन आयोग लागू होणार आहे. त्यानुसारच पगार मिळार आहे. 

या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जांची छाननी करण्यात येईल आणि त्यानंतर अर्जदारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पास झाल्यावर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. योग्य उमेदवारांना नंतर इंटरव्ह्यूला बोलविण्यात येणार आहे. 

या १ हजार ५३ पदांमधये स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ट्रोन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर, सेफ्टी सुपरवायझर, टेक्निशियनसोबत इतर पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यात मराठी तरूणांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि कायम स्वरूपी नोकरी मिळावावी, ही अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...