Job Oportunity in Municipal Corporation : मागील काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतींसहीत कार्यालये, प्रसुतीगृहे आणि रूग्णालयांसाठी एमएमआरडीएची मदत घेत होती. जी कंपनी त्यांना सुरक्षा देत होती, त्यांची मुदत आधीच सात वेळा वाढवण्यात आली होती. पण अजून मुदत न वाढवता 2 हजार सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रिया येत्या दिवसांमध्ये सुरू होणार आहे.
2015 पासून ज्या संस्था तीन वर्षांसाठी नियुक्त केल्या होत्या, त्यांची सतत मुदतवाढ करून आतापर्यंत त्यांची सेवा घेत आहेत. एमएमआरडीकडून सध्याच्या परिस्थितीकडे पाहून 2 हजार सुरक्षा रक्षकांची मदत घेतली असून यानंतर मुदतवाढ न करता सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
चेंबूर, मानखुर्द या भागांमध्ये एमएमआरडीएने बांधलेल्या बिल्डींग मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. पण या बिल्डींगमध्ये चोरी होऊ नये म्हणून एमएमआरडीएने जी सुरक्षा व्यवस्था नेमली होती. त्याला पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्तांनी त्यांचे दर आणि अटी मान्य करून तसेच पुढे चालू ठेवले.
अधिक वाचा : निरोगी त्वचेसाठी खा हे सुपरफूड्स
नंतर पालिकेने ०१ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१८ या काळात ईगल सिक्युरिटीज या सुरक्षा संस्थेची नेमणूक केली होती.
मुदतवाढ संपण्याआधीच नवीन संस्थेची नेमणूक करण्यासाठी टेंडर्स मागवणे गरजेचे होते. कोविडपूर्वीचे पहिले तीन महिने आणि नंतरचे एक वर्ष अशी मुदतवाढ त्यांना देण्यात आली.
पुढे कोविडच्या नावाखाली ही मुदतवाढ देत आतापर्यंत विना टेंडर या कंपनीला मासिक सव्वा कोटींच्या खर्चाचा भार वाहिला जात आहे. महापालिकेने या प्रकल्पबाधितांच्या बिल्डींग मध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये, यासाठी या तब्बल ९२५ सुरक्षा अधिकारी आणि ३० पर्यवेक्षक आदी मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगी सुरक्षेसाठी या संस्थेची नेमणूक केली होती.
अधिक वाचा : कोबी खाण्याचे फायदे आणि तोटे
सुरक्षा कंपनीला सतत तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊन त्यांना १०४ कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय महापालिका कार्यालये तसेच महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खासगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट २०१५ पासून देण्यात आले.
यासाठीही सुमारे ११०० खासगी सुरक्षा रक्षकांची सेवाही कंत्राट कालावधीपेक्षा अधिक कालावधीकरता घेतली जात आहे. यासाठीही शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे यासर्व ठिकाणी नवीन संस्थांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत असून दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
अधिक वाचा : स्ट्रॉबेरी खा रोगप्रतिकारक क्षमता वाढवा, या आजारांना दूर ठेवा