NABCONS Recruitment 2021: नाबार्डसाठी देशभरात होतेय भरती, दरमहा मिळेल १.५ लाख रुपयांचे वेतन

सरकारी नोकरी (Government job) च्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

NABCONS Recruitment 2021
नाबार्डसाठी देशभरात होतेय भरती, दरमहा वेतन १.५ लाख रुपये  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेसमध्ये भरती होणार आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ मे पर्यंत आहे.
  • दरमहा मिळणार १.५ लाख रुपयांचा पगार

नवी दिल्ली :  सरकारी नोकरी (Government job) च्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (National Bank for Agriculture and Rural Development) च्या सब्सिडियरी कंपनी नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेस (NABARD Consultancy Services) मध्ये ऑफ-फॉर्म डेव्हलपमेंटसाठी भरती केली जाणार आहे.

यातील रिक्त २२ जागांसाठी नोकर भरती  (Recruitment ) करण्यात येणार आहे. यासाठी एक जाहीरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशातील अनेक राज्याती या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई हेड ऑफिसमध्ये सीनियर कंसल्टेंट आणि विविध राज्यांमध्ये असलेल्या कार्यालयात ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट http://nabcons.com वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया १५ मे पासून सुरु झाली असून २९ मे अंतिम तारीख आहे. 

सिनियर कंसल्टंट पदासाठी  पात्रता आणि वयमर्यादा 

सिनियर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रामीण विकास, ग्रामीण प्रबंधन, एग्री बिझनेस मध्ये कमीतकमी ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीत-कमी १० वर्षांचा अनुभव असावा. तर उमेदवाराचे वय १ मे  २०२१  रोजी ४० वर्षांहून कमी आणि ५० वयापेक्षा कमी असावे. या पदासाठी वेतन  १.५  लाख रुपये दिले जाणार आहे.

ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी पात्रता आणि वयमर्यादा

तसेच ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीए किंवा आयटी/कंप्युटर एका विषय आणि कमीत-कमी ६० टक्के गुणांसह ग्रॅज्युएट डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय १ मे २०२१  रोजी २५ वर्षाहून कमी किंवा  ३५  वर्षापेक्षा जास्त नसावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना ४०  हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी