Navy Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांना अग्नीवीर पदावर काम करण्याची संधी, 'येथे' करा अर्ज

भारतीय नौदलातर्फे अग्निवीरची भरती केली जात आहे. या पदासाठी बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार एसएसआर पदासाठी अर्ज करु शकतात. नेव्ही अग्नीवीर भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

Job opportunity for 12th pass candidates in navy, apply early
बारावी पास उमेदवारांना नौदलात नोकरीची संधी, लवकर करा अर्ज  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतीय नौदलातर्फे अग्निवीरची भरती
  • बारावी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज
  • २२ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख

Navy Agniveer Recruitment 2022: भारतीय नौदलातर्फे (Indian Navy Recruitment) अग्निवीरची भरती (Agniveer Recruitment) केली जात आहे. या पदासाठी बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार एसएसआर पदासाठी अर्ज करू शकतात. नेव्ही अग्नीवीर भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  २२ जुलै २०२२ ही आहे म्हणजेच अर्ज प्रक्रियेसाठी फक्त ७ दिवस देण्यात आले आहेत. यापूर्वी नौदल एमआरअंतर्गत २०० रिक्त पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. भरतीशी संबंधित अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये मिळू शकणार आहे.

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - २८००
पुरुष - २,२४० पदे
महिला – ५६० पदे
महत्वाची तारीख
अर्ज - १५ जुलै २०२२
शेवटची तारीख - २२ जुलै २०२२

शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त मंडळाचे १०+२ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा कॉम्प्युटर सायन्स यापैकी कोणताही एक विषय असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया

सर्वप्रथम इयत्ता बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवार निवडला जाईल. नंतर निवडलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचा जन्म १ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५ दरम्यान झालेला असावा.

Navy Agniveer Recruitment 2022: असा करा अर्ज

स्टेप १- सर्वप्रथम उमेदवारांनी अग्निवीर एसएसआर रिक्त पदासाठी अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जा.
स्टेप २- यापूर्वी नोंदणी केली नसेल, तर तुमच्या ई-मेल आयडीसह वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.
स्टेप ३- त्यानंतर नोंदणीकृत ईमेल आयडीने लॉगिन करा आणि 'Current Opportunities' वर क्लिक करा.
स्टेप ४ - अर्ज बटणावर क्लिक करून संपूर्ण अर्ज भरा.
स्टेप ५ - आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि चांगल्या प्रतीची छायाचित्रे अपलोड करा. फोटोचा बॅकग्राऊंड निळा असावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी