भारतीय सैन्यदलात भरतीची संधी, अर्जासाठी बाकी आहेत थोडेच दिवस

Indian Army Recruitment 2021: खेड्या गावातील बारावी पास झालेले आणि महाविद्यालयात जाणाऱ्यांच्या मनात सैन्यदलात नोकरी मिळवण्याची मोठी इच्छा असते.

Opportunity for recruitment in Indian Army, few days left for application
भारतीय सैन्यदलात भरतीची संधी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • २७ वर्षांपर्यंतचे उमेदवार करू शकतात अर्ज
  • भारतीय सैन्य भरती २०२१ चे नोटिफिकेशन जारी
  • २७ व्या JAG Entry Scheme के अंतर्गत लॉ ग्रॅज्युएटची भरती

नवी दिल्ली : Indian Army Recruitment 2021: खेड्या गावातील बारावी पास झालेले आणि महाविद्यालयात जाणाऱ्यांच्या मनात सैन्यदलात नोकरी मिळवण्याची मोठी इच्छा असते. काही तरुण भारतीय सैन्यात भरती होण्याचं लहानपणापासून स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.  

ज्या इच्छुक आणि योग्य उमेदवारांना सैन्यदलात नोकरी हवी, असेल अशा उमेदवारांनी त्वरीत अर्ज भरावेत. कारण अर्ज भरण्याची तारीख ४ जून आहे. संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना या तारखेच्या आधी अर्ज  भरावे लागतील. इंडियन आर्मीने महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी लॉ ग्रॅज्युएट शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) कोर्ससाठी २७ व्या JAG Entery Scheme चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज ४ जून किंवा त्यापूर्वी भरू शकतात. या भरती अभियानाच्या माध्यमातून सैन्यात पुरुष आणि महिलांना १४ वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळणार आहे. म्हणजेच सुरुवातीला १० वर्षांसाठी आणि त्यानंतर ४ वर्षांची मुदतवाढ मिळेल. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.

सैन्य भरती २०२१ साठी पदांची माहिती

पुरुष उमेदवारांसाठी - ६ पदे
महिला उमेदवारांसाठी - २ पदे
पदांची एकूण संख्या - ८ पदे

काय आहे पात्रता ?

उमेदवार बार काऊन्सिल ऑफ इंडियाद्वारा मान्यता प्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह एलएलबी डिग्री (ग्रॅज्युएशन की डिग्री नंतर तीन वर्षांचा प्रोफेशनल कोर्स किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स) उमेदवारांना बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा राज्त वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

१ जुलै २०२१ रोजी किमान २१ आणि कमाल २७ वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
 

Indian Army Recruitment 2021: भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी