Panvel Municipal Corporation Recruitment: पनवेल महानगरपालिकेत भरती, पगार ६० हजारांपर्यंत

Panvel Municipal Corporation Recruitment 2021: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, पनवेल महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यात येत आहेत.

Panvel Municipal Corporation Recruitment
पनवेल महानगरपालिकेत भरती, पगार ६० हजारांपर्यंत 

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत (NUHM) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी शैक्षणिक अर्हता, विहीत वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या नेमणुका मा. उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांचे स्तरावर थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत. थेट मुलाखती आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल ता. पनवेल जि. रायगड येथे नमूद केलेल्या दिवशी आणि वेळेत घेण्यात येणार आहेत.

रिक्तपदांमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषधनिर्माता, आरोग्यसेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. अर्जाचा विहित नमुना पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com वर उपलब्ध आहे.

 1. पदाचे नाव - पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 
  रिक्त पदे - ४ 
  वयोमर्यादा - ४५ वर्षांपर्यंत (सेवानिवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यास ७० वर्षांपर्यंत)
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक
  अनुभव असल्यास प्राधान्य 
  महाराष्ट्र मेडिकल कौन्सील नोंदणी आवश्यक 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - ६०,००० रुपये प्रति महिना
 2. पदाचे नाव - अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 
  रिक्त पदे - ६ 
  वयोमर्यादा - ६५ वर्षांपर्यंत (सेवा निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यास ७० वर्षांपर्यंत)
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस पदवी आवश्यक 
  स्त्रीरोग तज्ञ (एम.डी / डी.जी.ओ) / मेडिसीन (एम.डी.) / बालरोगतज्ञ (एम.डी. / डी.सी.एच.) यांना प्राधान्य 
  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी
  अनुभव असल्यास प्राधान्य 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - ३०,००० रुपये प्रति महिना
 3. पदाचे नाव - अधिपरिचारीका GNM Staff Nurse 
  रिक्त पदे - ६
  वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण आवश्यक 
  शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्गिंग व मिडवाईफरी (GNM) विषयाची पदविका आवश्यक किंवा शासनमान्य संस्थेकडील बीएसी नर्सिंग (B.Sc. Nursing) पदवी
  महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - २०,००० रुपये प्रति महिना
 4. पदाचे नाव - औषधनिर्माता 
  रिक्त पदे - १ 
  वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे 
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - बी. फार्मा / डी. फार्मा, एमएसपीसी नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - १७,००० रुपये प्रति महिना
 5. पदाचे नाव - आरोग्य सेविका  
  रिक्त पदे - ७२
  वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे 
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - १०वी पास ANM (महाराष्ट्र नर्गिंग कौन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य) 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - १८,००० रुपये प्रति महिना
 6. पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  रिक्त पदे - ७
  वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे 
  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव - एच.एस.सी. डी एम एल टी, अनुभव असल्यास प्राधान्य 
  वेतन सुसूत्रीकरणानुसार ठोक मानधन रक्कम - १७,००० रुपये प्रति महिना

थेट मुलाखतीचे वेळापत्रक

 1. पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी - २५ मार्च २०२१ (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 2. अर्धवेळ वैद्यकीय अदिकारी - २५ मार्च २०२१ (दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - २६ मार्च २०२१ (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 4. औषधनिर्माता - २६ मार्च २०२१ (सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 5. अधिपरिचारिका - ६ एप्रिल २०२१ (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 6. आरोग्य सेविका - ७ एप्रिल २०२१ (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी www.panvelcorporation.com या लिंकवर क्लिक करा. अर्जाचा नमुना सुद्धा येथे उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी