Rozgar Melava, PM Narendra Modi distribute 71000 appointment letters to youth: राष्ट्रीय रोजगार मेळाव्या अंतर्गत देशातील सरकारी विभागात आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (13 एप्रिल 2023) रोजगार मेळावा अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 71,000 तरुणांना नोकरीच्या नियुक्तीपत्रांचे वितरण केले.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल.
Prime Minister Narendra Modi to virtually distribute appointment letters to 71,000 new recruits. pic.twitter.com/n5vYTDxgbo — ANI (@ANI) April 13, 2023
देशभरातील नवनियुक्त, भारत सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल तथा तिकीट लिपिक, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, वरिष्ठ ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षाधीन अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ - एमटीएस, अशा विविध स्थानांवर /पदांवर रुजू होतील.
#WATCH | More than 70,000 youths have got govt jobs in various departments of the central govt, congratulations to all of you. The process of giving govt jobs in NDA and BJP-ruled states is going on at a fast pace. Appointment letters were handed over to over 22,000 teachers in… pic.twitter.com/f3PJvNvgix — ANI (@ANI) April 13, 2023
नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटलं, आमचं सरकार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांची प्रतिभा आणि ऊर्जा यांना योग्य संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आजचा नवा भारत आता ज्या नवीन नीती आणि रणनीतीवर चालत आहे त्यामुळे देशात नव्या संधी आणि मार्ग खुले झाले आहेत.
दरम्यान नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात तीन वेगवेगळ्या भागांत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी येथे, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे आणि नागालँड येथील दिमापूर या भागांचा समावेश आहे.