Police Constable Jobs : मुंबई : राज्यातील पोलीस दलात ( Police force) मोठी भरती होत आहे.पोलीस दलात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची (candidates) वर्दी अंगावर चढवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्य राखीव पोलीस दलातील (Reserve Police Force)18 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या जागांसाठी 18 लाख उमेदवारांनी अर्ज केली आहेत. काही ठिकणी मैदान म्हणजेच ग्राउंड झालं आहे. आता परीक्षेच्या वाट अनेक उमेदवार पाहत आहेत. अशात इतक्या मोठ्या संख्येत आपलं नाव निवडलेल्या उमेदवारांमध्ये यावे असं वाटत असेल तर परीक्षेची उत्तम तयारी करणं आवश्यक आहे. (Police Constable Recruitment : do the preparation of Paper and Ground for police recruitment)
अधिक वाचा : सलमान भाईजान शरीरयष्टी कशी ठेवतो फिट
परीक्षेत कोणत्या गोष्टीवर लक्ष फोकस केलं पाहिजे. याची माहिती आपण घेणार आहोत. पोलीस भरतीची तयारी करत असताना आपण मागील भरतीचे काही प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. जेणेकरुन कोणत्या प्रकारचे प्रश्न केली जातात. कोणत्या प्रश्नांना वेळ लागतो. गणिताची प्रश्न किती असतात. याची पूर्व कल्पना आली तर तुम्ही त्यापद्धतीने परीक्षेची तयारीस करू शकतात.
अधिक वाचा : दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...
पोलीस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.
अधिक वाचा : शरीरातील चरबी जाळतील हे drinks
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण |
गणित | 25 | 25 |
बौद्धिक चाचणी | 25 | 25 |
मराठी व्याकरण | 25 | 25 |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 | 25 |
मराठी व्याकरण :
बाळासाहेब शिंदे सर
मो. रा. वाळंबे सर
गणित :
कोकिळा प्रकाशन – नितीन महाले
पंढरीनाथ राणे – गणित
बुध्दिमत्ता :
अनिल अंकलगी
सतिस वसे
सामान्य ज्ञान :
एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा
मेगा सामान्य ज्ञान
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
खुला | 18 वर्ष | 28 वर्ष |
मागास वर्ग / अनाथ / महिला आरक्षण | 18 वर्ष | 33 वर्ष |
पोलीस पाल्य / गृहरक्षक | 18 वर्ष | 33 वर्ष |
प्रकल्प ग्रस्थ / भूकंप ग्रस्थ | 18 वर्ष | 45 वर्ष |
खेळाडू उमेदवार | 18 वर्ष | 38 वर्ष |
अंशकालीन पदविधर | 18 वर्ष | 55 वर्ष |
पोलीस शिपाई / लोहमार्ग पोलीस शिपाई / कारागृह पोलीस शिपाई | 12 वी (HSC) पास असणे आवश्यक आहे. |
जिल्हा पोलीस बॅन्ड्समन | 10 वी (SSC) पास असणे आवश्यक आहे. |
पोलीस शिपाई चालक | 12 वी (HSC) पास असणे आवश्यक आहे. |
राज्य राखीव पोलीस दल | 12 वी (HSC) पास असणे आवश्यक आहे. |
जिल्हा पोलीस शिपाई चालक / लोहमार्ग पोलीस शिपाई चालक | मान्यताप्राप्त संस्थेमार्फत 12 वी पास असणे आवश्यक,LMV किंवा LMV – TR मोटार वाहन परवाना धारण करणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीनंतर 2 वर्षांच्या आत परवाना धारण करणे आवश्यक आहे. संगणक हाताळणी बाबत प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
पद | छाती पुरुष आणि महिला | उंची पुरुष आणि महिला |
पोलीस शिपाई | न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी. | महिला उंची – 155 cm पेक्षा कमी नसावी. पुरुष ंची – 165 पेक्षा कमी नसावी. |
जिल्हा / लोहमार्ग पोलीस शिपाई चालक | पुरुष उमेदवार- न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी. | पुरुष-165 पेक्षा कमी नसावी.,महिला उमेदवार :- उंची – 158 cm पेक्षा कमी नसावी. |
राज्य राखीव पोलीस दल | पुरुष उमेदवार- न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी. | पुरुष -उंची – 168 cm पेक्षा कमी नसावी. |
जिल्हा पोलीस बॅन्ड्समन | पुरुष उमेदवार- न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी. | पुरुष - उंची – 165 पेक्षा कमी नसावी, महिला - उंची – 155 cm पेक्षा कमी नसावी. |
मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र होतील.
लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
अधिक वाचा :
मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी | गुण |
1600 मीटर धावणे | 20 गुण |
गोळाफेक | 15 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
एकूण गुण | 50 |
पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे | द्यायचे गुण |
5 मी 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 20 गुण |
5 मी 10 सेकंद ते 5 मी 3० सेकंद | 18 गुण |
5 मी 30 सेकंद ते 5 मी 50 सेकंद | 16 गुण |
5 मी 50 सेकंद ते 6 मी 10 सेकंद | 12 गुण |
6 मी 30 सेकंद ते 6 मी 50 सेकंद | 15 गुण |
6 मी 50 सेकंद ते 7 मी 10 सेकंद | 10 गुण |
7 मी 10 सेकंद ते 7 मी 30 सेकंद | 5 गुण |
7 मी 30 सेकंदापेक्षा जास्त | 0 गुण |
100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी | द्यायचे गुण |
11.50 सेकंदापेक्षा कमी | 15 गुण |
11.50 सेकंद ते 12.50 सेकंद | 12 गुण |
12.50 सेकंद ते 13.50 सेकंद | 10 गुण |
13.50 सेकंद ते 14.50 सेकंद | 08 गुण |
14.50 सेकंद ते 15.50 सेकंद | 06 गुण |
15.50 सेकंद ते 16.50 सेकंद | 04 गुण |
16.50 सेकंद ते 17.50 सेकंद | 1 गुण |
17.50 सेकंदापेक्षा जास्त | 0 गुण |
800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावध | द्यायचे गुण |
2 मी 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 20 गुण |
2 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 00 सेकंद त्यापेक्षा कमी | 18 गुण |
3 मी 00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी | 16 गुण |
3 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 20 सेकंद व त्यापेक्षा कमी | 14 गुण |
3 मी 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी | 12 गुण |
3 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 40 सेकंद व त्यापेक्षा कमी | 10 गुण |
3 मी 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी | 08 गुण |
3 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मी 00 सेकंद व त्यापेक्षा कमी | 05 गुण |
4 मी 00 सेकंदापेक्षा जास्त | 00 गुण |
10 वी ची गुणपत्रिका ( 10 वी पास चे मार्क मेमो ) व बोर्ड सर्टिफिकेट ( 10 वी ची सनद )
जर तुमची 10 वी ची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट हरवले असेल तर तुम्ही ते बोर्डा मधून पुन्हा काढू शकता.
2) 12 वी ची गुणपत्रिका ( 12 वी पास चे मार्क मेमो ) व बोर्ड सर्टिफिकेट ( 12 वी ची सनद )
जर तुमची 12 वी ची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट हरवले असेल तर तुम्ही ते बोर्डा मधून पुन्हा काढू शकता.
3) 7 वी ची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट.
जर तुम्ही नक्षल ग्रस्त किंवा नक्षल ग्रस्त भागातील असाल तर तुम्हाला 7 वी ची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट देने अनिवार्य आहे.
4) कास्ट सर्टिफिकेट
5) N.O.C. ( Non Objection Certificate )
Non Objections Certificate शासकीय/ निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी अनिवार्य आहे
6) डोमोसाईल सर्टिफिकेट
महाराष्ट्राचे नागरिक असल्याचे प्रमाणपत्र
7) Non Creamy layer Certificate
8) जात पडताळणी सर्टिफिकेट
तुमच्याकडे जात पडताळणी चे सर्टिफिकेट असेल तर उत्तम आहे. जर नसेल तर काळजी करण्याची गरज नाही तुम्ही पोलीस खात्यात रुजू झालेल्या दिवसापासून 6 महिने तुम्हाला वेळ असतो.
9) रहिवासी दाखला
10) शाळा सोडल्याचा दाखला( TC ) Leaving Certificate
जर तुम्ही 12 वी च्या पुढील शिक्षण करत असाल तर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट देऊ शकता
11) ड्रायव्हिंग लायसेन्स
जर तुम्ही ड्रायव्हर या पदा साठी अर्ज करत असाल तर तुम्हाला ड्राइविंग लायसन्स असणे गरजेचे आहे
12) खेळाडू सर्टिफिकेट
13) विशेष आरक्षण
भूकंप ग्रस्त , प्रकल्प ग्रस्त, होमगार्ड, पोलीस पाल्य, अनाथ, इत्यादी
14) लेटेस्ट 5 कलर फोटो
मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस विभागाला तृतीय लिंग श्रेणीसाठी तरतुदींचा समावेश करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर 73 जागा ह्या तृतीयपंथींना सोडण्यात आल्या आहेत. या सर्व जागांसाठी अर्ज आले असून 73 पैकी 68 ट्रान्सजेंडरांनी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केले आहेत. तर पाच जणांनी ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केले आहेत. परंतु त्याच्या मैदानी चाचणीसाठी (Ground) मात्र अजून निर्णय पूर्ण झालेला नाही.
तृतीयपंथींना मैदानी चाचणीसाठी किती मीटर धावावे लागेल, गोळाफेक किती मीटर जायला हवा, चालक पदासाठी कोणते निकष, असतील हे निश्चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी एक महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.