Police Recruitment Maharashtra : पोलीस महाभरतीची जाहिरात निघाली, जाणून घ्या अर्ज करण्याची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील

Maharashtra Police Recruitment : राज्यात पोलिसांची 18 हजार पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने २०२१ साली रिक्त झालेल्या पदांची यादी जाहीर केली आहे. मुख्यालयाने आरक्षणनिहाय यादी जाहीर केली असून एकट्या मुंबई शहरात साडे सहा हजार पदांची भरती होणार आहे.

police recruitment
पोलीस भरती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात पोलिसांची 18 हजार पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
  • राज्य पोलीस मुख्यालयाने २०२१ साली रिक्त झालेल्या पदांची यादी जाहीर केली आहे.
  • एकट्या मुंबई शहरात साडे सहा हजार पदांची भरती होणार आहे.

Maharashtra Police Recruitment : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात निघेल अशी माहिती दिली होती. त्यानुसार राज्यात पोलिसांची 18 हजार पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने २०२१ साली रिक्त झालेल्या पदांची यादी जाहीर केली आहे. मुख्यालयाने आरक्षणनिहाय यादी जाहीर केली असून एकट्या मुंबई शहरात साडे सहा हजार पदांची भरती होणार आहे. संपूर्ण राज्यात पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांची एकूण १८ हजार ३३१ पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता काय जाणून घेऊया सविस्तर. (Police Recruitment Maharashtra advertisement for more than 18 thousand vacancy read in marathi)

भरतीबद्दल तपशील

  1. रिक्त पदे: 18,331 पदे.
  2.  शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (LMV Driving License).
  3. वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
  4. नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
  5. अर्ज सुरू होण्याची तारीख: 0३ नोव्हेंबर २०२२.
  6. अर्ज करण्याची अखेरची तारीख : ३0 नोव्हेंबर २०२२.
  7. वेतन 5,200 ते 20,200 रुपये (ग्रेड पे– 2,000रुपये.) विशेष भत्त्यासह 500 रुपये

कुठल्या जिल्ह्यात किती जागा

मुंबई - 6740
ठाणे शहर - 521
पुणे शहर - 720
पिंपरी चिंचवड - 216
मिरा भाईंदर - 986
नागपूर शहर - 308
नवी मुंबई - 204
अमरावती शहर - 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई - 620
ठाणे ग्रामीण - 68
रायगड -272
पालघर - 211
सिंधूदुर्ग - 99
रत्नागिरी - 131
नाशिक ग्रामीण - 454
अहमदनगर - 129
धुळे - 42
कोल्हापूर - 24
पुणे ग्रामीण - 579
सातारा - 145
सोलापूर ग्रामीण  - 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड - 155
परभणी - 75
हिंगोली - 21
नागपूर ग्रामीण - 132
भंडारा - 61
चंद्रपूर - 194
वर्धा - 90
गडचिरोली - 348
गोंदिया - 172
अमरावती ग्रामीण - 156
अकोला - 327
बुलढाणा - 51
यवतमाळ - 244
लोहमार्ग पुणे - 124
लोहमार्ग औरंगाबाद -154

आरक्षित जागा 

अनुसूचित जाती - 1811
अनुसूचित जमाती - 1350
विमुक्त जाती (अ) - 426
भटक्या जमाती (ब) - 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) - 292
विमुक्त मागास प्रवर्ग - 292
इतर मागास वर्ग - 2926
इडब्लूएस - 1544
खुला - 5468 जागा
एकूण - 14956

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी