SECR Recruitment 2022 : रेल्वे भरती : आयटीआय झालेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरीच्या (Government jobs) शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये (Railways) नोकरीची करण्याची सुवर्णसंधी चालून आली असून उमेदवारांनो (candidates) पटकन अर्ज करुन नोकरी मिळवा. रेल्वेमध्ये सुमारे एक हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Railway Recruitment
आयटीआय झालेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी   |  फोटो सौजन्य: Times Now

SECR Recruitment 2022 :  नवी दिल्ली :  सरकारी नोकरीच्या (Government jobs) शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये (Railways) नोकरीची करण्याची सुवर्णसंधी चालून आली असून उमेदवारांनो (candidates) पटकन अर्ज करुन नोकरी मिळवा. रेल्वेमध्ये सुमारे एक हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये (South East Central Railway) शिकाऊ पदांवरील भरती करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पूर्वी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (Apply online) करू शकतात. शिकाऊ पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी 25 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

1033 पदांची भरती

या भरतीअंतर्गत वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, मशिनिस्ट आणि फिटरसह अनेक ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1033 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Read Also : महाराष्ट्र दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा

Read Also :वाचा कामगार दिनाचा रंजक इतिहास

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावी. तर सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अशी असेल निवड प्रक्रिया?

या पदांवरील भरतीसाठी उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

येथे करा अर्ज

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पर्यंत apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेल्वेच्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी