IBPS RRB Recruitment : प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती, अर्जासाठी बाकी आहेत फक्त आठ दिवस

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसने (ibps) प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

IBPS RRB Recruitment
प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे.
  • प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित जाणार.
  • एससी आणि एसटी, दिव्यांग उमेदवारांना 175 आणि इतर उमेदवारांना 850 रुपये फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसने (ibps) प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑफिसर स्केल- I(PO) प्रोबेशनरी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क आणि ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल IIIच्या पदावर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.  नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून आहे. 

देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती होणार आहे. यापदासाठी ऑनलाईन अर्ज (Apply online) मागवण्यात आले आहेत. उमेदवार आयबीपीएसच्या वेबसाईटवर ipbs.in भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. या भरतीबाबचे नोटिफिकेशन 7 जूनला जारी करण्यात आले आहे. आयबीपीएस 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान पूर्व परिक्षेचे आयोजन करेल.

पूर्व परीक्षा कशी होणार?

आयबीपीएस पूर्व परीक्षा ऑनलाईन मोड द्वारे घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावले जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबाग तंत्रज्ञानस, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी असणे आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी मात्र 50 टक्केहून अधिक गुण आवश्यक आहेत. स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती तंत्रज्ञानसाठी संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.

काय आहे परीक्षा फी

एससी आणि एसटी, दिव्यांग उमेदवारांना 175 आणि इतर उमेदवारांना 850 रुपये फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल. दुसरीकडे तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यावर परीक्षा घेतली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी