India Post Recruitment 2022 | नवी दिल्ली : भारतीय पोस्ट विभागाने ग्रामीण डाक सेवक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व पात्र उमेदवार इंडिया पोस्ट GDS (India Post GDS Recruitment 2022) भर्ती २०२२ साठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in द्वारे ५ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. या पदांसाठी २ मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Recruitment for 38,926 posts in Indian Postal Department).
अधिक वाचा : जाणून घ्या परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे भारत पोस्ट विभागामध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक यांच्या ३८,९२६ जागांसाठी रिक्त पदांची भरती केली जाईल. शाखा पोस्ट मास्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना १२ हजार रुपये वेतन दिले जाईल. तर इतर पदांसाठी उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.
अधिक वाचा : वजन कमी करायचे असेल तरी लिंबासोबत करा गुळाचे सेवन
भारतीय पोस्टमधील या पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाची इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
सर्व पात्र उमेदवार इंडिया पोस्ट GDS भारती २०२२ साठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर ५ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.