BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी

Recruitment in Broadcast Engineering Consultants India Limited, Vacancies in BECIL, Jobs in BECIL : सुरक्षित नोकरी आणि चांगला पगार अशी स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी उत्तम संधी आहे.

Vacancies in BECIL
बेसिल या भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी
  • ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी
  • बेसिल या भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी

Recruitment in Broadcast Engineering Consultants India Limited, Vacancies in BECIL, Jobs in BECIL : सुरक्षित नोकरी आणि चांगला पगार अशी स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी उत्तम संधी आहे. दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अर्थात बेसिल या भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. बेसिल या भारत सरकारच्या कंपनीची स्थापना 24 मार्च 1995 रोजी करण्यात आली. ही एक मिनी रत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. रेडिओ आणि टीव्ही चॅनलसाठी ब्रॉडकास्टिंग अर्थात प्रसारणाच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. तसेच ही कंपनी संरक्षण, देशांतर्गत संरक्षण, पोलीस, निमसरकारी संरक्षण दले, यांच्यासाठी विशेष संचार, देखरेख, संरक्षण, देखरेखीची सॉफ्टवेअर या क्षेत्रात कार्यरत आहे.

बेसिलने वेगवेगळ्या पदांकरिता भरतीसाठी अधिसूचना (नोटिफिकेशन) काढली आहे. कनिष्ठ सहाय्यक, लॅब अटेंडंट, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत. गुवाहाटी आणि आसाममध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट becil.com च्या माध्यमातून होईल. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मंगळवार 21 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया, उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी अशी भरतीशी संबंधित सर्व माहिती becil.com या वेबसाईटवर देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी ही माहिती व्यवस्थित वाचावी आणि नंतर अर्ज करावा. 

वेगवेगळ्या पदांनुसार, निवडलेल्या उमेदवारांना 22 हजार ते 56 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. कौशल्य चाचणी, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. याकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांशी अधिकृतरित्या ईमेल किंवा फोनद्वारे संपर्क केला जाईल.  

शनिकृपेसाठी शनिवारी खा हे पदार्थ

या गावात कुंभकर्णासारखी कुठेही कितीही तास झोपतात माणसं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी