Navy Agniveer Recruitment 2022: नौदलात 1500 अग्निवीरांची भरती, आजच करा अर्ज

भारतीय नौदलाद्वारे मॅट्रिक रिक्रूट (MR) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) भरती प्रक्रियेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच गुरुवार, 8 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. नौदलाने प्रसिद्ध केलेल्या नेव्ही एमआर अग्निवीर भर्ती 2022 च्या अधिसूचनेनुसार, शेफ, स्टीवर्ड आणि हायजिनिस्टच्या एकूण 100 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

navy agniveer recruitment 2022, navy agniveer bharti 2022
Navy Agniveer Recruitment : नौदलात 1500 अग्निवीरांची भरती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अधिसूचनेनुसार, शेफ, स्टीवर्ड आणि हायजिनिस्टच्या एकूण 100 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • उमेदवार नौदलाच्या अधिकृत भर्ती पोर्टल, joinindiannavy.gov.in वर दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील.
  • भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत मॅक्ट्रिक रिक्रूटसाठी उमेदवारांना कोणत्यातरी मान्यता प्राप्त शिक्षण बोर्डातून 10 वी उत्तीर्ण होणं अपेक्षित

 Navy Agniveer Recruitment 2022: भारतीय नौदलात (Indian Navy) अग्निवीर (Agniveer ) म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलाद्वारे मॅट्रिक रिक्रूट (MR) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) भरती प्रक्रियेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच गुरुवार, 8 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. नौदलाने प्रसिद्ध केलेल्या नेव्ही एमआर अग्निवीर भर्ती 2022 च्या अधिसूचनेनुसार, शेफ, स्टीवर्ड आणि हायजिनिस्टच्या एकूण 100 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. केली जाणाऱ्या एकूण 1400 अग्निवीरांच्या भरतीमध्ये 280 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.(Recruitment of 1500 firemen in Navy, apply today)

अधिक वाचा  : Cyclone News : महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?

नेव्ही एमआर/एसएसआर अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया Application Process for Navy MR/SSR Firefighter Recruitment

भारतीय नौदलात मॅट्रिक रिक्रूट अग्निवीर भरती किंवा वरिष्ठ माध्यमिक भर्ती अग्निवीर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या अधिकृत भर्ती पोर्टल, joinindiannavy.gov.in वर दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील.  ही नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांना वरील अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आजपासून या वेबसाईटवर उमेदवार आपले अर्ज करू शकतील. 17 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. 

अधिक वाचा  : 'या' 5 गोष्टी आहेत माणसाच्या प्रगतीचे सीक्रेट्स

अर्जाची प्रक्रिया गुरुवार, 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून उमेदवार 17 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. दरम्यान नेव्ही नौदलातील  MR आणि SSR मधील रिक्त पदांसाठी अर्ज करताना त्यांना ऑनलाइन मोडद्वारे 550 रुपये शुल्क भरावे लागतील. 

नेव्ही एमआर/एसएसआर अग्निवीर भरतीसाठी पात्रता निकष

 भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत मॅक्ट्रिक रिक्रूटसाठी उमेदवारांना कोणत्यातरी मान्यता प्राप्त शिक्षण बोर्डातून 10 वी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. याप्रकारे सीनिअर सेकेंड्री रिक्रूटसाठी उमेदवारांना गणित और भौतिक विज्ञानासह विज्ञान किंवा जीव विज्ञान किंवा यापैकी  एका विषयासह 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अपेक्षित आहे. यासह ते दोन्ही भरतीसाठी अर्ज करणाऱ्या  अर्जदारांचा जन्म 1 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरमन्यान झालेलं असले पाहिजे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना नौदलाने विहित केलेल्या भौतिक मानकांची पूर्तता करावी लागेल, अधिक माहितीसाठी आणि इतर तपशीलांसाठी भरती अधिसूचना पहावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी