Recruitment in BMC : मुंबईत मनपात होणार भरती, ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर

Recruitment to be held in MCGM or BMC, last date for offline application announced : मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai : MCGM / Brihanmumbai Municipal Corporation : BMC) येथे भरती होणार आहे. मनपात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Recruitment to be held in MCGM or BMC, last date for offline application announced
मुंबईत मनपात होणार भरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत मनपात होणार भरती
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर
  • मनपात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी

Recruitment to be held in MCGM or BMC, last date for offline application announced : मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai : MCGM / Brihanmumbai Municipal Corporation : BMC) येथे भरती होणार आहे. मनपात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झाली आहे. । जॉब पाहिजे । काम-धंदा

कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ज्ञ अर्थात ईएनटी (Ear Nose Throat : ENT) अँड स्पीच थेरपी डॉक्टर या पदासाठी मुंबई महानगरपालिकेत भरती होणार आहे. फक्त एका पदावर भरती होणार आहे. यामुळे एका पात्र उमेदवारालाच नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्याय मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ईएनटी (Ear Nose Throat : ENT) अँड स्पीच थेरपी डॉक्टर या पदासाठी सर्वसाधारण गटातून जास्तीत जास्त 38 वर्षांचा पात्र उमेदवार (महिला अथवा पुरुष) अर्ज करू शकेल. याच पदासाठी मागासवर्यीय गटातून जास्तीत जास्त 43 वर्षांचा पात्र उमेदवार (महिला अथवा पुरुष) अर्ज करू शकेल. दरमहा किमान 35 हजार 400 अथवा कमाल 1 लाख 12 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. ऑफलाईन अर्ज प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001 (Advertisement for filling post of Audiologist and Speech Therapist at Seth A.J.B Municipal ENT Hospital, Fort, Mumbai,400001.) येथे करता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार ईएनटी (Ear Nose Throat : ENT) अँड स्पीच थेरपी डॉक्टर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 ही आहे. 

  1. भरती होणार असलेली जागा : 1
  2. रिक्त पद : कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ञ
  3. वयाची अट : सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
  4. परीक्षा फी : नाही
  5. पगार किती : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
  6. नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
  7. अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  8. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001
  9. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी