Saraswat Bank Recruitment: सारस्वत बँकेत ३०० जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Saraswat bank recruitment 2021: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सारस्वत बँकेत एकूण ३०० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.

saraswatbank.com recruitment
(फोटो सौजन्य: saraswatbank.com) 

थोडं पण कामाचं

  • सारस्वत बँकेत नोकरीची संधी
  • १५० कनिष्ठ अधिकाऱ्यांची आणि १५० बिझनेस डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांची भरती

मुंबई : सारस्वत बँकेच्या विविध शाखांमध्ये एकूण ३०० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी या पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेतील कुठल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा किती आहे? तसेच महत्वाच्या तारखा काय आहेत? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या.

१५० कनिष्ठ अधिकाऱ्यांची भरती

सारस्वत बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० कनिष्ठ अधिकारी- मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) या पदांकरीता अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता - वाणिज्य, विज्ञान, अथवा व्यवस्थापन विभागातून किमान प्रथम श्रेणीची पदवी किंवा पदव्यूत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात किमान द्वितीय श्रेणी. 

वयोमर्यादा - १/०२/२०२१ पर्यंत २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

उमेदवाराने ज्या स्थानासाठी अर्ज केला आहे त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज saraswatbank.com वर उपलब्ध असलेल्या स्वरुपात पाठवावेत. ही लिंक ५ मार्च ते १९ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. 

१५० बिझनेस डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांची भरती

सारस्वत बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, इंदूर, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग) या पदांकरीता अर्ज मागवले आहेत.

शैक्षणिक पात्रता - पदवी अभ्यासक्रमात किमान द्वितीय श्रेणी

वयोमर्यादा - १/०२/२०२१ पर्यंत २७ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

अनुभव - बँक / एनबीएफसीचा कमीत कमी एक वर्षाचा सेल्स / मार्केटिंगचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावा. 

उमेदवाराने ज्या स्थानासाठी अर्ज केला आहे त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज saraswatbank.com वर उपलब्ध असलेल्या स्वरुपात पाठवावेत. ही लिंक १७ मार्च ते ३१ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पद भरतीची जाहिरात वाचण्यासाठी business development officer या लिंकवर क्लिक करा. आणि कनिष्ठ अधिकारी पद भरतीची जाहिरात वाचण्यासाठी junior officer या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी