मराठी तरुणांसाठी खुशखबर, रेल्वेत ३३६२ पदांसाठी भरती

रेल्वेमध्यो नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने पश्चिम मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे रिजनमध्ये पुन्हा एकदा नव्या पदांची भरतीसाठी वॅकेंसी निघाली आहे.

sarkari naukri 2020 indian railway recruitment 2020 rrb west central railway eastern railway government jobs news in marathi lbs 1
मराठी तरुणांसाठी खुशखबर, रेल्वेत ३३६२ पदांसाठी भरती  

थोडं पण कामाचं

  • Sarkari Naukri 2020: रेल्वेमध्ये नोकरीची शानदार संधी, १४ फेब्रुवारीनंतर अर्ज करू शकणार 
  • इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमनसह ५७० पदासाठी भरतीसाठी जाहिरात दिली आहे.
  • ईस्टर्न रेल्वे रिजन कोलकता येथे ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत २७९२ पदांसाठी भरती प्रकिया होणार आहे.

Railway Recruitment 2020: रेल्वेमध्यो नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने पश्चिम मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे रिजनमध्ये पुन्हा एकदा नव्या पदांची भरतीसाठी वॅकेंसी निघाली आहे. खाकरून या पदासाठी १० पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. जाणून घ्या रेल्वेमध्ये सरकारी नोकरी ( Sarkari Naukri 2020 ) कधी आणि कसा अर्ज करायचा आहे. 


West Central Railway 2020: पश्चिम मध्य रेलवे (WCR)ने ट्रेड अप्रेंटीस अंतर्गत इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमनसह ५७० पदासाठी भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदांसाठी १५ फेब्रुवारी २०२० पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. खास करून १० पास विद्यार्थ्यांना या पदावर सरकारी नोकरी (Sarkari Naukri) ची संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता पात्र शैक्षणिक संस्थेतून ५० टक्के मार्कनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

कधीपर्यंत करू शकता अर्ज ?  

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा १५ वर्ष आणि अधिकाधिक वयोमर्यादा २४ वर्ष ही निश्चित करण्यात आली आहे. यासाठी १०० रुपयांचे अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. संबंधीत नोकरी संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि या नोकरीचे नोटीफिकेशन चेक करा. 


रेल्वेमध्ये १० पास उमेदवारांसाठी व्हॅकन्सी, १४ फेब्रुवारीपासून अर्ज करू शकणार 

Eastern Railway Recruitment 2020:  रेलवे भरती बोर्ड  (RRB)ने वेगवेगळ्या रिजनमधील अनेक पदासाठी व्हॅकन्सी काढण्यात आली आहे. ईस्टर्न रेल्वे रिजन कोलकता येथे ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत २७९२ पदांसाठी भरती प्रकिया होणार आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार १४ फेब्रुवारी २०२० पासून अर्ज भरू शकणार आहेत. याची मुदत १३ मार्चपर्यंत ठेवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता पात्र शैक्षणिक संस्थेतून ५० टक्के मार्कनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी