सरकारी नोकरीची संधी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात लिपिक पदासाठी भरती

Mahahsscboard Recruitment 2019: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

maharashtra state board of secondary and higher secondary education pune recruitment for junior clerk posts
राज्य शिक्षण मंडळात भरती (फोटो सौजन्य: www.mahahsscboard.in) 

थोडं पण कामाचं

 • नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आनंदाची बातमी 
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भरती
 • कनिष्ठ लिपिक संवर्गासाठी पदभरती 
 • भरतीची जाहिरात शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल
 • ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ६ ऑक्टोबर २०१९ 

Mahahsscboard Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत कनिष्ठ लिपिक संवर्गाची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात आले आहेत. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती.

 1. पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
 2. पदांची संख्या - २६६ 
 3. वेतनश्रेणी - एस-६ (रुपये १९,९०० - ६३,२००)

शैक्षणिक अर्हता: 

 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्याशी समकक्ष घोषित केलेली इतर शैक्षणिक अर्हता
 2. मराठी टंकलेखनाची किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा आणि इंग्रजी टंकलेखनाची किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआयने घेतलेली परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा:

 1. खुला / सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे कमाल ३८ वर्षे
 2. मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे 

परीक्षा शुल्क:

 1. खुला प्रवर्ग - ५५० रुपये 
 2. राखीव प्रवर्ग -  ३५० रुपये 

महत्वाच्या तारखा: 

 1. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: १६ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजल्यापासून) 
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ ऑक्टोबर २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) 

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे. अर्जात सादर केलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी. भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपला अर्ज भरण्यापूर्वी ही जाहिरात सविस्तर वाचावी आणि त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करावे आणि त्यानंतर नाव नोंदणी करावी.

महत्वाच्या सूचना

 1. उमेदवाराला देण्यात आलेलं परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदण्यात येणार नाही.
 2. उमेदवाराने अर्जात दिलेल्या तीनही पसंतीच्या क्रमातील उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उपलब्ध केंद्रांपैकी एक परीक्षा केंद्र देण्यात येईल. 
 3. अर्ज सादर करताना उमेदवाराने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी