एसबीआय क्लर्क २०२१: ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत वाढली २० मेपर्यत

जॉब पाहिजे
Updated May 17, 2021 | 22:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

SBI Clerk 2021 : एसबीआय ज्युनियर असोसिएट्स/ क्लर्क परीक्षा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आता २० मे २०२१ ही असणार आहे. ऑनलाईन अर्ज sbi.co.in/careers वर उपलब्ध आहेत.

SBI Clerk/ Junior Associate Recruitment 2021
एसबीआय क्लर्क / ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेंट २०२१  
थोडं पण कामाचं
  • ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढून २० मेपर्यत
  • पूर्व परीक्षा जूनमध्ये आणि मुख्य परीक्षा ३१ जुलै २०२१ला
  • एसबीआय ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेट परीक्षेद्वारे ५,२३७ जागा भरल्या जाणार

नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने, एसबीआय क्लर्क २०२१ (SBI Clerk 2021 recruitment examination)परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. उमेदवार आता २० मे २०२१ पर्यत ऑनलाईन अर्ज करू शकतील. नोंदणी करण्याची प्रक्रिया २७ एप्रिलला सुरू झाली आहे. या प्रक्रियेची मुदत आज संपणार होती मात्र ती आता गुरूवारपर्यत वाढवण्यात आली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज sbi.co.in/careers या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या नोकरभरतीचे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

SBI Clerk 2021 : स्टेट बॅंक क्लर्क २०२१ नोंदणी करण्याची मुदत वाढली. एसबीआय ज्युनियर असोसिएट्स/ क्लर्क परीक्षा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आता २० मे २०२१ ही असणार आहे. ऑनलाईन अर्ज sbi.co.in/careers वर उपलब्ध आहेत.
 

एसबीआय क्लर्क / ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेंट २०२१ : महत्त्वाच्या तारखा

Event Date
Start of Online Application April 27, 2021
Last date to fill online application, pay fees May 20, 2021
Last date to print filled application form June 1, 2021
Date of Preliminary Exam (Tentative) June 2021
Date of Final Exam 2021 July 31, 2021

एसबीआय क्लर्क २०२१ : पात्रता

२० ते २८ वयोगटातील पदवीवर या परीक्षेसाठी पात्र आहेत. वयाचे मोजमाप करण्यासंदर्भातील अंतिम तारीख (cut off date)ही १ एप्रिल २०२१ ही आहे. राखीव वर्गासाठी सरकारच्या नियमाप्रमाणे वयाची अट शिथिल असेल.

वयाची अट 

याशिवाय ज्यांनी १६ ऑगस्ट २०२१पर्यत आपली पदवी पूर्ण केली असेल किंवा आता पदवीचे शिक्षण घेत असतील असे उमेदवारसुद्धा या परीक्षेसाठी पात्र आहेत. अधिकृत सूचनेनुसार, या परीक्षेसाठी पात्र ठरण्याचे वय हे विद्यापीठ किंवा संस्थेने दिलेले मार्कशीट किंवा सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट यावर असणाऱ्या तारीखेनुसार असणार आहे. ज्या परीक्षेचा निकाल विद्यापीठ किंवा संस्था आपल्या वेबसाईटवर जाहीर करतील त्या विद्यापीठाने किंवा संस्थेने सर्टिफिकेट देताना त्यावर वेबसाईटवर निकाल जाहीर करण्याची जी तारीख दिलेली असेल ती पास होण्याची तारीख समजली जाईल.

पूर्व परीक्षा जूनमध्ये आणि मुख्य परीक्षा ३१ जुलै २०२१ला

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एसबीआय ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेंट २०२१च्या सूचनापत्रकाला काळजीपूर्वक वाचावे. एसबीआय ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेट परीक्षेद्वारे ५,२३७ जागा भरल्या जाणार आहेत. तात्पुरते पूर्व परीक्षा जूनमध्ये आणि मुख्य परीक्षा ३१ जुलै २०२१ला घेण्याचे नियोजन आहे. निश्चित तारखा या लवकरच जाहीर करण्यात येतील.


स्टेट बॅंक ऑफ इंडियाती करियर

स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. स्टेट बॅंकेतील करियर हे अतिशय सुरक्षित आणि चांगले करियर समजले जाते. देशभरातून उमेदवार स्टेट बॅंकेत नोकरी करण्यास इच्छुक असतात. बॅंकिंग क्षेत्रात आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार असून स्टेट बॅंकेत करियरची मोठीच संधी असणार आहे. त्यामुळे स्टेट बॅंकेत नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. परीक्षेसाठी स्टेट बॅंकेने पुरेसा वेळ दिला असून तब्बल ५,२३७ जागा या परीक्षेद्वारे भरल्या जाणे अपेक्षित आहे. स्टेट बॅंकेच्या देशात हजारो शाखा आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडिया वेळोवेळी नोकरभरती करत असते. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असते. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन स्टेट बॅंकेने परीक्षेचा अर्ज करण्याची मुदत आता २० मे २०२१ पर्यत वाढवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी