SBI Clerk Prelims Result 2021: स्टेट बँकेच्या क्लर्कसाठी परीक्षा दिली आहे का? मग येथे तपासा प्रीलिम्स रिझल्ट

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे अनेकजण स्वप्न पाहत असतात. एसबीआयकडून क्लर्क प्रीलिम्स परीक्षेच निकाल जाहीर झाले आहेत.

SBI Clerk Prelims Result 2021
एसबीआय प्रीलिम्स क्लर्क परीक्षेचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर आपला प्रीलिम्सचा रिझल्ट तपासू शकतात
  • प्रीलिम्स परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले आहेत, तेच पुढील मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
  • SBI junior Associate Post साठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे अनेकजण स्वप्न पाहत असतात. एसबीआयकडून क्लर्क प्रीलिम्स परीक्षेच निकाल जाहीर झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) 21 सप्टेंबर 2021 रोजी घोषित केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता, ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर आपला प्रीलिम्सचा रिझल्ट तपासू शकतात. या प्रीलिम्स परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले आहेत, तेच पुढील मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. SBI junior Associate Post साठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

प्रीलिम्स रिझल्टनंतर आता मुख्य परीक्षा 10 जुलै ते 13 जुलै 2021 पर्यंत आयोजित केली गेली आहे. SBI लिपिक मुख्य परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. विद्यार्थ्यांना 200 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क कापला जाईल, याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे.  

कसा पाहाल प्रीलिम्स परीक्षेचा निकाल?

  •  sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वरच्या बाजूला असलेल्या Careers पर्यायावर क्लिक करा.
  • येथे SBI junior associate post Result वर क्लिक करा.
  • तुमचे डिटेल्स टाकून Login करा. त्यानंतर रिझल्ट दिसेल.

या भरतीमध्ये एकूण 5237 पदांसाठी अर्जदारांची नियुक्ती केली जाईल. नियुक्ती झालेले Junior Associate म्हणून काम करतील. प्रीलिम्स परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी अशा फेऱ्या पार कराव्या लागतील. अर्जदारांची संख्या अधिक असल्याने अनेक उमेदवार वेबसाइट लोड होत नसल्याची तक्रार करत आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकत होते. 20 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी