SBI recruitment 2021 : स्टेट बॅक ऑफ इंडिया 6348 पदाची मेगा भरती जाहीर, पटकन करा अर्ज

SBI recruitment 2021 : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

SBI recruitment 2021
स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये तब्बल 6,348 जागांसाठी मेगा भरती
  • महाराष्ट्रात एकूण 390 रिक्त जागा भरण्यात येणार
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021

मुंबई : SBI recruitment 2021 : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये तब्बल 6,348 जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. “अप्रेंटीस” या पदाच्या एकूण 6,348 जागा संपूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रात एकूण 390 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (SBI Apprentice Recruitment 2021: Apply for 6100 posts on sbi.co.in, details here) यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.

स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पद क्रमांक पदाचे नाव पदाची संख्या

01. अप्रेंटीस ( संपूर्ण भारत ) 5,958
02. अप्रेंटीस ( महाराष्ट्र ) 390
एकूण जागा 6,348

शैक्षणिक पात्रता :-

अप्रेंटीस उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असावा.
वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत ( SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑगस्ट 2021 मध्ये घेतली जाईल.
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करावा.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- ibpsonline.ibps.in
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 26 जुलै 2021.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी