टाटा समुहाच्या 'एअर इंडिया'त नोकरीची सुवर्णसंधी

Tata Groups Air India Recruiting Female Cabin Crew Know Details : टाटा समुहाच्या 'एअर इंडिया' कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. 'एअर इंडिया'च्या @airindiain या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातले ट्वीट आले आहे.

Tata Groups Air India Recruiting Female Cabin Crew
टाटा समुहाच्या 'एअर इंडिया'त नोकरीची सुवर्णसंधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • टाटा समुहाच्या 'एअर इंडिया'त नोकरीची सुवर्णसंधी
 • अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातले ट्वीट आले आहेत
 • वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी ट्विट करून जाहिराती प्रसिद्ध करत आहेत

Tata Groups Air India Recruiting Female Cabin Crew Know Details : टाटा समुहाच्या 'एअर इंडिया' कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. 'एअर इंडिया'च्या @airindiain या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातले ट्वीट आले आहे. 

मागील काही दिवसांपासून 'एअर इंडिया' वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी ट्विट करून जाहिराती प्रसिद्ध करत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मागील काही तासांपासून महिला क्रू सदस्यांची भरती करण्यासाठी 'एअर इंडिया' ट्वीट करत आहे. टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पदांकरिता भरतीच्या जाहिराती ट्वीट केल्या जात आहेत. 

अधिकृत ट्विटर हँडलवरून कंपनी कोणत्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज पाठवावा याचेही मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक जाहिरातीसोबत क्यूआर कोड ट्वीट केला जात आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून अथवा क्यूआर कोडखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने नोकरीसाठी अर्ज करता येईल. 

Meta Layoffs: Twitter नंतर आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ, जाणून घ्या कारण

भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती; अर्ज घेण्यास सुरुवात, जाणून घ्या कुठे अन् कसा कराल अर्ज

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याने सादर करायची माहिती

 1. भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड आणि आधारकार्डधारक नागरिक नोकरीसाठी अर्ज करू शकतात
 2. नवोदीत अर्जदार (फ्रेशर) 18 ते 22 या वयोगटातील असण्याचे बंधन
 3. अनुभवी अर्जदार जास्तीत जास्त 32 वर्षांचा असावा
 4. अर्जदाराला इंग्रजी आणि हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे बंधनकारक
 5. अर्जदाराचे आय व्हिजन 6/6 असावे
 6. अर्जदाराची किमान उंची 155 सेमी असावी
 7. अर्जदाराची BMI रेंज 18 ते 22 असावी
 8. अर्जदार किमान 69 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक

महत्त्वाचे

 1. एअर इंडियाच्या महिला क्रू सदस्यांना वेस्टर्न फॉर्मल ड्रेस कोड परिधान करावा लागेल.
 2. मुलाखतीसाठी येताना सोबत सीव्हीची एक छापील प्रत आणणे आवश्यक.
 3. अनुभवी अर्जदाराने SEP Card ची कॉपी मुलाखतीसाठी येताना सोबत आणावी.

केबिन क्रू सदस्यांचे काम

 1. प्रवाशांचे विमानात स्वागत करणे
 2. प्रवासी विमानात असताना नियमानुसार त्यांचा पाहुणचार करणे
 3. विमानात असताना नियमानुसार प्रवाशांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांना मदत करणे
 4. विमानाच्या उड्डाणाआधी, उड्डाण काळात तसेच उतल्यानंतर प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नियमानुसार सुरक्षित प्रवासाशी संबंधित क्रू सदस्यांच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळणे
 5. केबिन क्रू म्हणजे एअर होस्टेस आणि फ्लाइट स्टिवर्ड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी