कोडिंगमध्ये करियर करणाऱ्यांसाठी शानदार संधी, कॉन्टेस्टमध्ये भाग घ्या, मिळवा 'टीसीएस'मध्ये जॉब आणि लाखो रुपये

जॉब पाहिजे
Updated May 24, 2021 | 14:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसकडून (टीसीएस) दरवर्षी 'कॉन्टेस्ट कोडविटा' या कोडिंग कॉन्टेस्टचे आयोजन केले जाते. या कॉन्टेस्टमुळे दरवर्षी हजारो लोकांनी नोकरी मिळते आहे.

Tata Consultancy Services organizes contest CodeVita for youth
टीसीएसची कोडविटा स्पर्धा, कोडिंगमध्ये करियरची सुवर्णसंधी 
थोडं पण कामाचं
  • टीसीएसची स्पर्धा
  • स्पर्धेतील विजेत्या कोडिंग तंत्रज्ञांना टीसीएसमध्ये चांगली नोकरी
  • लाखो रुपयांची बक्षिसे

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसकडून(Tata Consultancy Services) (TCS) (टीसीएस) दरवर्षी 'कॉन्टेस्ट कोडविटा' (contest CodeVita)या कोडिंग कॉन्टेस्टचे (coding contest) आयोजन केले जाते. या कॉन्टेस्टची विशेष बाब ही की याच्या मदतीने दरवर्षी हजारो लोकांनी नोकरी (jobs through contest) मिळते आहे. टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसच्या या कोडिंग कॉन्टेस्टने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness book of world records)देखील स्थान पटकावले आहे. २०१४ पासून आतापर्यत या कॉन्टेस्टद्वारे ११,११२ ऑफर्स देण्यात आल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसकडून कोडविटा (CodeVita),इन्जिक्क्स ( EngiNX),द इंजिनियरिंग डिझाईन अॅंड आयओटी कॉन्टेस्ट ( the engineering design and IoT contest) आणि हॅकक्वेस्ट  (HackQuest) या चार तंत्रज्ञानविषयक स्पर्धांचे  (Technology contest)आयोजन करण्यात येते आणि त्यातून उत्तम तंत्रज्ञांना निवडून करियची मोठी संधी (great career opportunity) दिली जाते, शिवाय लाखो रुपयांची बक्षिसेदेखील (prize of lacs of rupees) मिळतात.

कॉन्टेस्ट कोडविटाचे स्पर्धक झाले मालामाल


मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसच्या 'कॉन्टेस्ट कोडविटा'च्या (contest CodeVita)नवव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्टेस्टद्वारे ३,४१७ तरुणांना नोकरी मिळाली होती. टॉप-३ स्पर्धकांना टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसच्या रिसर्च अॅड इनोव्हेशन टीममध्ये म्हणजे संशोधन आणि कल्पकता टीममध्ये सहभागी करून घेण्यात आल्या होते. याशिवाय त्यांना २०-२० हजार डॉलरचे (जवळपास १५ लाख रुपये) बक्षीसदेखील मिळाले होते. मागील दोन वर्षांपासून या कॉन्टेस्टद्वारे निवडण्यात आलेले २५० विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी मिळाली आहे.

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी घेतला पुढाकार


डेव्हलपर तंत्रज्ञांच्या टीम विकसित करण्यासाठी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या मागील काही वर्षात अशा मार्गांकडे वळल्या आहेत. गुगलने २०१७मध्ये कॅगलचे (Kaggle)अधिग्रहण केले होते. कॅगल हा डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा एक ऑनलाईन गट किंवा समूह आहे. त्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टने २०१८मध्ये गिथब (Github) या गटाचे ७.५ अब्ज डॉलरला अधिग्रहण केले होते. २०१६ मध्ये विप्रो या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने ५० कोटी डॉलरमध्ये टॉपकोडर (Topcoder) या कोडिंग गटाचे अधिग्रहण केले होते. टॉपकोडरसोबत जवळपास १५ लाख कोडर्स जोडले गेलेले आहेत. 

टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसकडून दरवर्षी चार स्पर्धांचे आयोजन


टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसचे चीफ टेक्निकल ऑफिसरने सांगितले की कोडविटाचे विजेते टीसीएसच्या रिसर्च अॅंड इनोव्हेशनच्या स्पेशालिस्ट गटाबरोबर काम करतात. यांचे काम विचार आणि इनोव्हेशनला कोडिंगमध्ये बदलणे हे असते. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वात आधी २०१२मध्ये देशातील अग्रगण्य संस्था आयआयटीमध्ये (IIT) सुरू करण्यात आले होते. सध्या टीसीएसकडून चार फ्लॅगशीप कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात येते आहे. कोडविटा (CodeVita),इन्जिक्क्स ( EngiNX),द इंजिनियरिंग डिझाईन अॅंड आयओटी कॉन्टेस्ट ( the engineering design and IoT contest) आणि हॅकक्वेस्ट  (HackQuest) या त्या चार स्पर्धा आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी