TMC Recruitment: ठाणे मनपात नोकरीची संधी, कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे भरती

Thane Municipal Corporation Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे मनपा अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात भरती प्रक्रिया होत आहे. 

Thane Municipal Corporation Recruitment 2023 apply for attendant post in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital see notification pdf
Thane Municipal Corporation Recruitment: ठाणे मनपात नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती 
थोडं पण कामाचं
  • ठाणे मनपात नोकरीची सुवर्णसंधी
  • थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
  • जाणून घ्या कोणत्या पदासाठी भरती आणि शैक्षणिक अर्हता काय

Thane Municipal Corporation Recruitment 2023 direct interview: ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट संवर्गातील रिक्त पदासाठी जाहिरात सहा महिन्याच्या (179 दिवसाच्या) कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेवादारंनी थेट मुलाखतीला उपस्थित रहावे लागणार आहे.

कुठे होणार मुलाखत?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.

हे पण वाचा : या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल

पदाचे नाव - 

अटेंडंट

पदांची संख्या - 

अनुसूचित जाती - 2
अनुसूचित जमाती - 2 
भटक्या जमाती (ड) - 1 
विशेष मागास प्रवर्ग - 1
इतर मागास प्रवर्ग - 6 
आदुघ- 2 
खुला - 10 
एकूण - 24 जागा

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC)उत्तीर्ण
  2. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी कामाचा 3 वर्षांचा अनुभव
  3. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तरपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. 
  4. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

दरमहा मानधन - 20,000 रुपये 

वय - खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे

हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी Thane Municipal Corporation Recruitment Notification PDF या लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. 

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात 179 कालावधीसाठी हे पद भरायचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी