Government Jobs: बेरोजगारीचा काळ दाखवणारं मोदी सरकार देणार सरकारी नोकरी, पीएम मोदीने दिले हे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी बातमी दिली आहे. पीएम मोदींनी सरकारला निर्देश दिले आहेत की पुढील 1.5 वर्षात 10 लाख सरकारी भरती करण्यात येईल. हे काम मिशन मोडमध्ये केले जाईल.

Modi government will provide 10 lakh jobs
बेरोजगारीचा काळ दाखवणारं मोदी सरकार देणार 10 लाख नोकऱ्या   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली.
  • पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती होणार
  • भारतातील शहरातील बेरोजगारीचा 2021 मधील एप्रिल-जून या तीन महिन्यातील दर वाढून 12.6 टक्क्यांवर

PM Modi on Government Jobs: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी बातमी दिली आहे. पीएम मोदींनी सरकारला निर्देश दिले आहेत की पुढील 1.5 वर्षात 10 लाख सरकारी भरती करण्यात येईल. हे काम मिशन मोडमध्ये केले जाईल. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान बेरोजगारी वाढत असल्यानं आणि नोकरी देण्याच्या आश्वासनाने सत्तेत आलेल्या भाजपवर विरोधक नेहमी टीका करत. 

पीएमओने ट्विट केली नोकरीची माहिती

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले की, सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी असे निर्देश दिले आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या कार्यकाळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. विरोधक सातत्याने सरकारवर दबाव निर्माण करत आहेत. परंतु पंतप्रधान मोदींच्या या ट्विटमुळे विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. 

एप्रिलच्या सुरुवातीला, पंतप्रधान मोदी यांनी उच्च सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यास सांगितले होते जेणेकरून संधी निर्माण होतील. भारतातील शहरातील बेरोजगारीचा 2021 मधील एप्रिल-जून या तीन महिन्यातील दर वाढून 12.6 टक्क्यांवर पोहचला आहे. तर जानेवारी-मार्च  या तीन महिन्यात हा दर 9.3 टक्के होता. दरम्यान हा दर कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान असलेल्या 20.8 टक्क्यांच्या पातळीपेक्षा कमी आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी