UGC NET Admit Card Download: UGC NET परीक्षा 2023 चे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विषय आणि तारखेनुसार वेळापत्रक जारी केले आहे. आता प्रवेशपत्र देखील लवकरच जारी केले जाणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर नोटीस बघू शकता. परीक्षा 21 फेब्रुवारीपासून 10 मार्च,2023 पर्यंत आहे. विषय व तारखेनुसार वेळापत्रक साईटवर उपलब्ध आहे. (स्टेज 1, 57 विषय). NTA कडून आयोजित केलेल्या सत्रात 57 विषयांवर परीक्षा होईल. 2023 साठी यूजीसी नेट प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्डवर परीक्षेची तारीख, ठिकाण नमूद केलेले आहे. UGC NET ची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून 10 मार्च,2023 च्या दरम्यान होणार आहे. (UGC NET Admit Card UGC Exam Schedule Announced Candidates now waiting for admit card Know when to get Admit Card)
सर्व तपशील एकदा तपासून घ्या आणि पीडीएफच्या रुपात डाऊनलोड करू शकता. या कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेस बसता येऊ शकत नाही. परीक्षा केंद्राबाबतच्या सर्व सूचना वेबसाईटवर दिल्या जातील. परीक्षेचे वेळापत्रक आणि उर्वरित विषयांची नावे योग्यवेळी जाहीर केले जातील. यासंबंधीची सर्व माहिती साईटवर उपलब्ध आहे.
UGC NET 2023च्या अधिकृत वेबसाइटवर ugcnet.nta.nic.in जा. UGC-NET डिसेंबर 2022 'UGC NET डिसेंबर 2022 फेज 1 रेझ्युमेची तारीख आणि विषयानुसार वेळापत्रक' वर क्लिक करा.