UPSC Success Story: पुस्तकं घ्यायला नव्हते पैसे, एनीसनं पेपर वाचून पास केली UPSC

जॉब पाहिजे
Updated May 21, 2020 | 21:04 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Success Story IAS: केरळमध्ये राहणाऱ्या एनीस कनमनी जॉय यांनी ज्या पद्धतीनं यूपीएससीची परीक्षा पास केली, तो एखादा रेकॉर्ड असू शकतो.दुसऱ्या प्रयत्नात मिळालेल्या त्यांच्या यशाची गोष्ट वाचली तर आपण आश्चर्यचकित व्हाल

Ennis Kanmani Joy
पुस्तकं घ्यायला नव्हते पैसे, एनीसनं पेपर वाचून पास केली UPSC 

थोडं पण कामाचं

  • एमबीबीएससाठी निवड झाली नाही तर बनल्या नर्स
  • केरळच्या एनीसचे वडील आहेत शेतकरी
  • पुस्तकं आणि स्टडी मटेरिअल शिवाय क्रॅक केली यूपीएससी परीक्षा

केरळच्या एनीस कनमनी जॉय यांनी आयएएस होण्यासाठी जे करून दाखवलं, त्यानंतर कदाचितच काही आणखी सांगता येईल. देशातील सर्वात मोठी आणि सर्वात कठीण परीक्षा पास करण्यासाठी एनीस यांच्याजवळ कुठलंही स्टडी मटेरिअल नव्हतं. केरळच्या पिरवोम इथलं लहानसं गाव पंपाकुडा इथं राहणाऱ्या एनीस यांचे वडील शेतकरी आहेत आणि आई शेतात काम करते. घरात फक्त खाण्या-पिण्यासाठी काही मिळालं तरीही खूप झालं, अशी परिस्थिती. अशात एनिस यांच्याजवळ अभ्यासासाठी काही पुस्तकं असणं शक्यच नव्हतं. या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा पास करून ६५वी रँक मिळवली.

एनीस यांना व्हायचं होतं डॉक्टर

दहावीपर्यंत एनीस आपल्या गावातच शिकल्या. मात्र १२वी साठी त्यांना एर्नाकुलमला जावं लागलं. एनीस यांना डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांची निवड एमबीबीएसमध्ये झाली नाही आणि अखेर त्यांनी बीएससी नर्सिंगमध्ये प्रवेश घेतला आणि त्या नर्स झाल्या. नर्स झाल्यानंतर त्यांना मनापासून आनंद होत नव्हता. त्यांना असं काही करायचं होतं ज्यात त्यांना मान-सन्मानासह दुसऱ्यांची मदतही करता येईल.

रेल्वे प्रवासादरम्यान मिळाली आयएएस परीक्षेची माहिती

एकदा एनीस कुठे तरी जात होत्या आणि रेल्वेत त्यांना दोघं मिळाले, ज्यांचा अभ्यासाबद्दल संवाद सुरू होता. एनीस यांना त्या दोघांनी सांगितलं की, त्यांनी आयएएस परीक्षेची तयारी करावी. ही परीक्षा कठीण आहे पण जर आपण मेहनत घेतली तर यात यश मिळतं, असं त्या दोघांनी एनीसला सांगितलं. तोपर्यंत एनीस यांनी माहितीच नव्हतं की, आयएएस परीक्षा कुठल्याही विषयात पदवीधर झाल्यानंतर देऊ शकतात. यानंतर मात्र एनीस यांनी आपलं संपूर्ण लक्ष यूपीएससी परीक्षेवर केंद्रित केलं.

ना पुस्तकं ना ही स्पर्धा परीक्षेचं मॅगझिन

या परीक्षेची तयारी करतांना एनीस यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे पुस्तकं आणि स्पर्धा परीक्षेच्या मॅगझिनचा अभाव. याशिवाय परीक्षेची तयारी करणं म्हणजे सूर्य गाठण्यासारखं वाटत होतं. मात्र एनीस यांनी ठरवलं की, त्या न्यूज पेपरद्वारे आपली तयारी करतील आणि त्यांचा हा प्रयत्न पहिल्यांदा अयशस्वी ठरला. पण दुसऱ्यांदा एनीस यांना यश मिळालं.

न्यूज पेपरच्या मदतीनं केली तयारी

एनीस सांगतात की, त्यांनी न्यूज पेपर्सचे एडिट पेज आणि करंट अफेअर वर आपला फोकस ठेवला. संपूर्ण योजना आणि सुविधांसोबत त्यांना यातून भरपूर माहिती मिळत गेली. पहिल्या प्रयत्नात एनीस यांना यूपीएससीमध्ये ५८० वी रँक मिळाली. मात्र दुसऱ्यांदा त्यांनी ६५वी रँक मिळवत आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी