MSC Bank Trainee Junior Officer & Trainee Clerk Recruitment 2022: मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १९५ जागांवर पदभरती निघाली आहे. बँकेतील विविध पदांवर ही पदभरती असून ५ मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकता. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२२ आहे. जाणून घेऊया कुठल्या पदासाठी नोकरभरती असून या पदांची काय पात्रता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी क्लर्क पदासाठी नोकरभरती सुरू आहे. इच्छूक उमेदवारांनी www.mscbank.com या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी. तसेच या www.ibps.in वेबसाईटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करावा
एकूण जागा - १९५
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर - २९ पद
ट्रेनी क्लर्क – १६६ पद
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी कमाल वयोमर्यादा ३२ आहे. तर ट्रेनी क्लकर पदासाठी वयोमर्यादा २८ इतकी आहे. शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी बँकेच्या www.mscbank.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
ट्रेनी ज्युनियर पदासाठी १ हजार ७७० रुपये शुल्क असणार आहे. तर ट्रेनी क्लर्क पदासाठी अर्ज करण्यासाठी १ हजार १८० शुल्क असणार आहे. शुल्क भरताना ऑनलाईन माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाइल वॉलेट आणि आयएमपीएसचा वापर करता येईल.