VVCMC Recruitment: वसई-विरार मनपात ६६ जागांसाठी भरती, थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Vasai-Virar Municipal Corporation Recruitment 2021: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती होत आहे. जाणून घेऊया कुठल्या पदांसाठी ही भरती होत आहे.

vasai virar city municipal corporation recruitment 2021
फोटो सौजन्य: vvcmc.in 

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकरिता शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक संवर्गातील अस्थायी स्वरुपातील पदे करारपद्धतीने ११ महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. NUHM सन २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास अधिन राहून विहित अर्हता प्राप्त उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीस खालील पदनामानुसार नमुद केलेल्या दिवशी वसई-विरार शहर महानगरपालिका, पापडखिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व) येथे आवश्यक कागदपत्रांच्या मुळप्रती व साक्षांकित सत्यप्रतीसह विहीत नमुन्यातील भरलेल्या अर्जासह उपस्थित रहावे. अर्जाचा नमुना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या www.vvmc.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 1. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) - MBBS
  एकुण भरावयाची पदे - १०
  शैक्षणिक अर्हता - M.B.B.S. MCI/MMC कडील नोंदणी अनिवार्य
  वयोमर्यादा - सेवा प्रवेशाची कमला वयोमर्यादा - ७० वर्षे 
  मानधन - ६०,००० रुपये (ठोक मासिक मानधन शानामार्फत)
 2. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) MBBS
  एकुण भरावयाची पदे - २१
  शैक्षणिक अर्हता - M.B.B.S. MCI/MMC कडील नोंदणी अनिवार्य
  वयोमर्यादा - सेवा प्रवेशाची कमला वयोमर्यादा - ७० वर्षे 
  मानधन - ३०,००० रुपये (ठोक मासिक मानधन शानामार्फत)
 3. पदाचे नाव - स्टाफ नर्स 
  एकुण भरावयाची पदे - ४
  शैक्षणिक अर्हता - B.Sc Nursing/Gen.Nursing MNSकडील नोंदणी अनिवार्य 
  वयोमर्यादा - सेवा प्रवेशाची कमला वयोमर्यादा - ६५ वर्षे 
  मानधन - २०,००० रुपये (ठोक मासिक मानधन शानामार्फत)
 4. पदाचे नाव - औषध निर्माता 
  एकुण भरावयाची पदे - १०
  शैक्षणिक अर्हता - B.Pharma / D.Pharma MSPCकडील नोंदणी अनिवार्य 
  वयोमर्यादा - सेवा प्रवेशाची कमला वयोमर्यादा - ६५ वर्षे 
  मानधन - १७,००० रुपये (ठोक मासिक मानधन शानामार्फत)
 5. पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  एकुण भरावयाची पदे - २१
  शैक्षणिक अर्हता - DMLT
  वयोमर्यादा - सेवा प्रवेशाची कमला वयोमर्यादा - ६५ वर्षे 
  मानधन - १७,००० रुपये (ठोक मासिक मानधन शानामार्फत)

या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात उमेदवारांनी वाचून घ्यावी. तसेच मुलाखतीला जाताना अर्जदाराने मुळ प्रमाणपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती कुठल्या आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. 

थेट मुलाखतीचा दिनांक आणि वेळ 

 1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) एमबीबीएस 
  मुलाखतीचा दिनांक - २३ मार्च २०२१ 
  मुलाखतीचा तपशील - अर्ज स्वीकारण्याची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० वाजता
  अर्ज छाननीची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० 
  मुलाखतीची वेळ - सकाळी ११ वाजल्यापासून पुढे 
 2. वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) एमबीबीएस 
  मुलाखतीचा दिनांक - २३ मार्च २०२१ 
  मुलाखतीचा तपशील - अर्ज स्वीकारण्याची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० वाजता
  अर्ज छाननीची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० 
  मुलाखतीची वेळ - सकाळी ११ वाजल्यापासून पुढे 
 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  मुलाखतीचा दिनांक - २३ मार्च २०२१ 
  मुलाखतीचा तपशील - अर्ज स्वीकारण्याची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० वाजता
  अर्ज छाननीची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० 
  मुलाखतीची वेळ - सकाळी ११ वाजल्यापासून पुढे 
 4. स्टाफ नर्स 
  मुलाखतीचा दिनांक - २४ मार्च २०२१ 
  मुलाखतीचा तपशील - अर्ज स्वीकारण्याची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० वाजता
  अर्ज छाननीची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० 
  मुलाखतीची वेळ - सकाळी ११ वाजल्यापासून पुढे 
 5. औषध निर्माता 
  मुलाखतीचा दिनांक - २४ मार्च २०२१ 
  मुलाखतीचा तपशील - अर्ज स्वीकारण्याची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० वाजता
  अर्ज छाननीची वेळ - सकाळी ९.३० ते १०.३० 
  मुलाखतीची वेळ - सकाळी ११ वाजल्यापासून पुढे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी