वसई-विरार मनपामध्ये भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, जाणून घ्या सविस्तर

Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2021: वसई-विरार महानगरपालिकेत थेट मुलाखतीच्या माध्यमातून पदे भरण्यात येणार आहेत. जाणून घ्या सविस्तर...

Vasai virar municipal corporation announced recruitment to fulfill various posts
वसई-विरार मनपामध्ये भरती (फोटो सौजन्य: www.vvcmc.in) 

थोडं पण कामाचं

 • वसई-विरार महानगरपालिकेत भरती
 • मनपाच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र शहर क्षयरोग कार्यालयासाठी पदांची भरती 
 • २२ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांच्या थेट मुलाखत होणार

मुंबई : वसई विरार शहर महागनरपालिकेच्या (Vasai Virar City Municipal Corporation) कार्यक्षेत्रात स्वतंत्र शहर क्षयरोग कार्यालयासाठी खालील अस्थायी स्वरुपातील पदे करारपद्धतीने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात करारतत्वावर भरण्यात येणार आहेत. यासाठी विहित अर्हता प्राप्त उमेदवारांच्या थेट मुलाखती (Walk in interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी शुक्रवार दि. २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वसई-विरार शहर महानगरपालिका, पापडखिंड डॅम, फुलपाडा, विरार पूर्व येथे आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या मुळप्रती आणि साक्षांकित सत्यप्रती दोन पासपोर्ट साईज फोटोजसह विहित नमुन्यातील अर्जासह उपस्थित रहावे. 

पदाचे नाव : क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता

 1. पदांची संख्या : ३ 
 2. प्रवर्ग : अ. जमाती - २, खुला प्रवर्ग - १ 
 3. शैक्षणिक अर्हता : सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण 
  TBHV चा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण
  संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीतकमी २ महिने)
 4. प्राधान्यक्षम पात्रता : बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्त्याचे शासनमान्य प्रशिक्षण पूर्ण.
  स्वच्छता निरिक्षक पदाचा शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  संबंधित पदनिहाय कामामध्ये कमीतकमी १ वर्षाचा अनुभव
 5. मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन १५,५०० रुपये 

पदाचे नाव : जिल्हा पी. पी. एम. समन्वयक (Public private mix co-ordinator)

 1. पदांची संख्या : १
 2. प्रवर्ग : खुला - १
 3. शैक्षणिक अर्हता : सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा सरकारमान्य समाजशास्त्र या विषयातून पदव्यूत्तर पदवी.
  Communication/ACSM/Public Private Partnership/ Health/ Projects / Programs मध्ये कामाचा १ वर्षाचा अनुभव
  दुचाकी वाहन चालक परवाना व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक
  संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीतकमी २ महिने)
 4. प्राधान्यक्षम पात्रता : संबंधित पदनिहाय कामात कमीतकमी २ वर्षांचा अनुभव
 5. मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन २०,००० रुपये

पदाचे नाव : वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (STS)

 1. पदांची संख्या : ४
 2. प्रवर्ग : अ. जमाती - १, अ. जाती - १, वि. जा/भ.ज.(ब) / भ.ज.(क)/ भ.ज.(ड)- १, खुला प्रवर्ग - १
 3. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 
  मराठी ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग व इंग्रजी शब्दप्रती मिनिट टायपिंग सोबत संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (MS-CIT)
  दुचाकी वाहन चालक परवाना व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक
 4. प्राधान्यक्षम पात्रता : TBHVचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण
  समाजकार्य किंवा वैद्यकीय समाजकार्य या विषयाची सरकारमान्य पदवी / पदविका धारक 
  बहुउद्देशीय आरोग्यकार्यकर्त्याचे शासनमान्य प्रशिक्षण पूर्ण
  संबंधित पदनिहाय कामामध्ये कमीतकमी १ वर्षाचा अनुभव 
 5. मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन २०,००० रुपये 

पदाचे नाव : वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक 

 1. पदांची संख्या : १
 2. प्रवर्ग : अ. जाती- १ 
 3. शैक्षणिक अर्हता : शासनमान्य संस्थेचा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविकाधारक
  संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीत कमी २ महिने)
  दुचाकी वाहन परवाना व दुचाकी वाहन चालवता येणे आवश्यक 
 4. प्राधान्यक्षम पात्रता : संबंधित पदनिहाय कामात कमीत कमी १ वर्षाचा अनुभव
 5. मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन २०,००० रुपये

पदाचे नाव : औषध निर्माता 

 1. पदांची संख्या : १
 2. प्रवर्ग : खुला - १
 3. शैक्षणिक अर्हता : औषध निर्माता पदवी / पदविका  
 4. प्राधान्यक्षम पात्रता : नामांकित रुग्णालय / शासनमान्य आरोग्य केंद्रात औषधसाठा व्यवस्थापन करण्यासाठी १ वर्ष कामाचा अनुभव 
 5. मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन १७००० रुपये 

वयोमर्यादा : ६५ वर्षांपर्यंत असेल. वयोमर्यादा ही मुलाखत रोजीची गणली जाईल.

अर्ज भरण्याची पद्धत :

महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन सदर अर्ज स्वाक्षरीसह भरुन त्यासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रति जोडणे आवश्यक आहे. दुचाकी वाहनाचा परवाना (आवश्यक पदांसाठी) आवश्यक आहे. अर्जात नमुद विहित ठिकाणी उमेदवाराचा अलिकडील फोटो (रुंदी ३.५ से.मी. व उंची ४.५ से.मी.) चिटकवून त्यावर स्वाक्षरी करावी. 

उमेदवारांना मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी