कोरोना काळातही मिळेल नोकरी; आरोग्य सेवेत नोकरी मिळवण्यासाठी वाचा 'या' टीप्स

सध्या देशासह जगावर कोरोनाचे संकट आले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे पण त्यांच्या उपचारासाठी पुरेसं मनुष्यबळ(Resources) शासनाकडे नाही.

you will get a job during the Corona Epidemic Period Read these tips for healthcare jobs
आरोग्य सेवेत नोकरी मिळवण्यासाठी वाचा 'या' टीप्स   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

 • इंटरनेटच्या मदतीने मिळेल हेल्थ केअरमध्ये नोकरी
 • नोकरी मिळवण्यासाठी बायोडाटा असतो महत्त्वाचा
 • अधिक गोष्टींचं प्रशिक्षण घेणं ठरेल फायद्याचे

नवी दिल्ली : सध्या देशासह जगावर कोरोनाचे संकट आले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे पण त्यांच्या उपचारासाठी पुरेसं मनुष्यबळ(Resources) शासनाकडे नाही. यामुळे राज्य सरकार(State Government) आता आरोग्य सेवेत(Health Care) भर्ती काढणार असून विविध पदे भरली जाणार आहेत. खासगी आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कंपन्यापण आता नोकरी देत आहेत. अशात जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुमच्याकडे काही प्रोसेशनल गुण असणं आवश्यक आहे. आरोग्य सेवेत नोकरी शोधतांना काय केलं पाहिजे, कशाप्रकारे मुलाखतीची तयारी केली पाहिजे याविषयीची माहिती तुमच्याकडे असणं तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे, याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Use The Internet) इंटरनेटचा वापर योग्य कामासाठी करा 

 • नोकरी शोधण्यासाठी इंटरनेट आपल्याला खूप मदत करेल. यामुळे आपण इंटरनेटचा उपयोग योग्य करावा. हेल्थ केअर(healthcare) आरोग्य सेवेत नोकरी शोधताना कोणत्या पदासाठी तुम्ही नोकरी पाहात आहात त्याचा वारंवार शोध घ्या. तुम्हाला माहित असलेल्या संकेतस्थळांवर जाऊन नोकरीचा शोध घ्या.
 • तुम्ही ज्या हेल्थ केअर कंपनींमध्ये नोकरी शोधत आहात तेथील नोकरदारांचे रिव्ह्यू(Review) पहा. 
 • जर तुम्हाला कंपनी आवडली असेल तर तु्म्ही तेथे नोकरीसाठी तयारी सुरू करा. तुमच्या संपर्कात तुमच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना जोडा. त्यांच्याकडून नोकरीसाठी काही सल्ला घ्या किंवा कुठे भर्ती आहे याची कल्पना करुन घ्या.
 • (internet) इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही वरच्या पदावर जाऊ शकतात. त्यामुळे संधी(opportunity) शोधत रहा

Update Your Resume तुमचा रिझुमे(बायोडाटा) अपडेट करा

 

कसा असेल तुमचा बायोडाटा 

 •  तुमचा रिझुमे(बायोडाटा) हा तुमचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे तुमचा बायोडाटा व्यवस्थित अपडेट करा.
 • थोडक्यात आपली माहिती द्या. हेल्थ केअर, (आरोग्य सेवेसंबंधित) तुमचा अनुभव नसेल तर तो अनुभव तुमच्या बायोडाटामधून काढून टाका.
 • नेहमी एक सारखा बायोडाटा पाठवून नका. त्यात काही तरी बदल करा.
 • रिझुमे बनविण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा पण प्रफेशेनल रिझुमे टेम्पलेट निवडा.
 • आपल्या रेझ्युमेच्या शीर्षस्थानी उद्दीष्ट सूचीबद्ध करण्याऐवजी करिअर स्नॅपशॉट करा. हे तुमचे कौशल्य दर्शवतील.
 • लक्षात ठेवा तुम्ही कला क्षेत्रात जाणार नाहीत. त्यामुळे रिझुमे अधिक सजावटीचा नसावा. त्यामुळे तुमचा रिझुमे हा युनिक असावा.

 Get More Training अधिक प्रशिक्षण घ्या 

 •  तुम्हाला मोठ्या पदापर्यंत जायचं असेल तर अधिक गोष्टींचं प्रशिक्षण घ्या.
 • व्यवसाय किंवा व्यवसाय प्रशासनाचा(Business Administration.) अभ्यासक्रम शिका..
 •  प्रगत वैद्यकीय कोडिंग शिकून घ्या.
 • कोणीतरी गुरू शोधा, ज्याने आधी त्या पदावर जाण्यासाठी काही शिक्षण घेतलं असेल. त्याच्याकडून सल्ले आणि मार्गदर्शन घ्या. (public speaking class)पब्लिक स्पेकिंग क्लास जॉईन करा. त्यातून तुमची संवाद करण्याची शैली सुधारेल. यामुळे तुम्ही दबावातही काम करण्यास सक्षम बनाल. आणि तुमची मुलाखतीची शैली ही सुधारेल.
 • प्रशिक्षण आणि अनुभव हे दोन गुण आहेत जे तुम्हाला इतर अर्जदारांच्या तुलनेत सरशी देईल. 

 Do Some Volunteer Work काहीतरी स्वयंसेवक म्हणून काम करा

 • हे तुम्हाला अधिकचे प्रशिक्षण आणि तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत करेल. हेल्थकेअर जॉब ही मुख्यत: रूग्णांना वेळ आणि आधार देण्याबद्दल असते म्हणून मालकांना नोकरदार हा स्वयंसेवक असल्यास अधिक आवडत असतो.
 • तुमचा अनुभव वाढविण्यास स्वयंसेवकाचे काम फायदेशीर ठरेल.

 Network With Professionals व्यावसायिकांसह नेटवर्क

 • आपण अशा लोकांचा गट मिळवाल जे आपण काय करीत असलेल्या मागण्या समजतात आणि त्यावर चर्चा करू शकतात.
 • तुम्हाला पाठिंबा अधिक असेल तर तुम्ही जास्त यश मिळता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी