ZP Recruitment: जिल्हा परिषदेत भरती, पगार 60,000 रुपये, जाणून घ्या पदाचे नाव आणि इतर माहिती

Recruitment in Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घ्या कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे.

ZP recruitment 2023 maharashtra jalgaon jilha parishad mo mbbs post vacancy how to apply check notification pdf zpjalgaon gov in 
ZP Recruitment: जिल्हा परिषदेत भरती, पगार 60,000 रुपये, जाणून घ्या पदाचे नाव आणि इतर माहिती (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत भरती प्रक्रिया
  • 38 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, पगार 60 हजार रुपये

Maharashtra jobs naukri news updates: जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत रिकत पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. एकूण 38 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. तर नियुक्ती ही जळगाव नगरपरिषद, मनपा अंतर्गत असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या साईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, 25 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या MO - MBBS या पदाच्या निवड यादीमध्ये खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांची राखीव प्रवर्गातून निवड करण्यात आलेली आहे त्या प्रवर्गातील उमेदवारांची पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवार मिळाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

हे पण वाचा : दररोजच्या या सवयींमुळे गळतात केस

जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तेसच या पादंसाठी शासनाचे सेवा, नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामानून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. 

एमबीबीएस पदासाठी वयोमर्यादा 70 वर्षे राहील. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे स्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतरच नियुक्ती आदेश देण्यात येईल.

हे पण वाचा : जेवताना पाणी प्यावे की नाही? तुम्ही काय करता?

पदभरती प्रक्रिया रद्द करणे / स्थगित करणे / पदांची संख्या कमी जास्त करणेबाबतचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव यांनी राखून ठेवलेले आहे. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही. 

अर्ज कसा करावा? 

उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतींसह आपले अर्ज प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग), जिल्हा परिषद, जळगाव येथे 28 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस सोडून) व्यक्तीश: / टपालाद्वारे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

हे पण वाचा : बाळाला या भांड्यात जेवण भरवल्यास मिळतील असंख्य फायदे

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या zpjalgaon.gov.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा. तसेच भरती प्रक्रियेचं अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ फाईल पाहण्यासाठी zpjalgaon.gov.in recruitment notification pdf या लिंकवर क्लिक करा. 

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर तपशिल वेळोवेळी जळगाव जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर zpjalgaon.gov.in प्रसिद्ध करण्यात येईल. या संदर्भात व्यक्तीश: / दुरध्वी / ई-मेल अथवा वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी