सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
दागिने निर्माते आणि सराफा व्यापाऱ्यांकडून खरेदी तसेच मागणी वाढल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे दिल्लीत सोन्याचा दर ३५,५७० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.
शिक्का निर्मात्यांकडून चांदीची मागणी वाढली आणि त्यामुळे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ३५५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर ३९,५३० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, स्थानिक ज्वेलर्सकडून सोनं-चांदीची मागणी वाढली आणि त्यामुळेच दागिन्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर १,४१५.८० डॉलर प्रति औंसवर स्थिर आहे. तर, चांदीच्या दरात वाढ होऊन १५.५० डॉलर प्रति औंस इतका झाला.
अखिल भारतीय सराफा संघाच्यानुसार, दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १००-१०० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा दर क्रमश: ३५,५७० रुपये आणि ३५,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.
सोमवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात २५ रुपयांनी घसरण झाली होती.
बाजारातील विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. तसेच चीनचा जीडीपीने २७ वर्षांचा निचांक गाठला आहे.
ज्वेलर्सच्या मते, सोनं-चांदीच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे त्याचा परिणाम हा ग्राहकांवरही होत आहे. सोनं-चांदी महागल्याने ग्राहकांची मागणी सुद्धा कमी होताना दिसत आहे.