मुंबई : कमी वेळेत सुखकर आणि अधिक प्रवास करण्यासाठी विमान प्रवासाचा मार्ग स्विकारला जातो. मात्र, नेमक्या कुठल्या एअरलाईन्सची सेवा सर्वश्रेष्ठ आणि कुठल्या एअरलाईन्सचं तिकिट बुक करावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला जगातील १० सर्वात सुरक्षित एअरलाईन्सची माहिती देणार आहोत. विमान प्रवास कंपन्यांना रेटिंग देताना AirlineRatings.com ने जगभरातील १० सर्वात सुरक्षित एअरलाईन्सची लिस्ट जाहीर केली आहे.
01
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
AirlineRatings.com च्या यादीत एअर न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे. २००० साली आलेल्या आर्थिक संकटानंतर कंपनीने पून्हा एकदा आपली चमक निर्माण केली आहे.
02
/ 10
(फोटो सौजन्य : AP)
अलास्का एअरलाईन्सला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जागा मिळाली आहे. २०१६ मध्ये २.६ बिलियन डॉलरची कमाई करणाऱ्या या कंपनीच्या एअरलाईन्सचा २००० सालानंतर कुठलाही अपघात झाल्याचं समोर आलेलं नाहीये.
03
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
ऑल निपॉन एअरवेज या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये कंपनीने आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली आहे.
04
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
ब्रिटिश एअरवेज सर्वात सुरक्षित कंपन्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन दशकात या कंपनीच्या विमानांचा कुठल्याही प्रकारचा मोठा अपघात झाल्याच आतापर्यंत समोर आलेलं नाहीये.
05
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
१० सर्वात चांगल्या एअरलाईन्सच्या यादित नाव आल्यानंतर कैथी एअरलाईन्सने जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन्सच्या यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे. १९६० नंतर या एअरलाईन्सच्या विमाना संदर्भात कुठलीही वाईट घटना घडलेली नाहीये.
06
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
आरामदायक आणि सुविधेसह प्रवास करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमीरात एअरलाईन्सला AirlineRatings.com च्या यादीत सहावं स्थान मिळालं आहे.
07
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
Ethihad एअरलाईन्स या यादीत सातव्या क्रमांकावरील सुरक्षित एअरलाईन्स आहे.
08
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
१९८८ मध्ये सुरु झालेली तायवान कंपनीची ईवा एअर ने आपल्या प्रभावी रेकॉर्डमुळे आठवा क्रमांकावर जागा बनवली आहे.
09
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
Finnair कंपनी सोबत १९६० मध्ये एक अपघात झाला होता आणि त्यानंतर आतापर्यंत कुठलीही दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाहीये. ही कंपनी सुरक्षित एअरलाईन्सच्या यादीत ९व्या क्रमांकावर आहे.
10
/ 10
(फोटो सौजन्य : Twitter)
AirlineRatings.com च्या मते, Hawaiian एअरलाईन्स दहाव्या क्रमांकावरील सर्वात सुरक्षित एअरलाईन्स कंपनी आहे.