आधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये? मग ही बातमी वाचाच

PAN-Aadhaar linking: पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे एकमेकांसोबत लिंक करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या. मात्र, अद्यापही काही नागरिकांनी आधार-पॅन लिंक केलेलं नाहीये. अशाच ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

aadhaar pan card linking date december 31 income tax department ministry of finance business news
आधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये? मग ही बातमी वाचाच  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आधार-पॅन लिंक न केलेल्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
  • आधार-पॅन लिंक करण्यासाठी सरकारची मुदतवाढ
  • ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येणार आधार-पॅन लिंक

नवी दिल्ली: सरकारद्वारा नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. आधार कार्ड हे सर्वसामान्य नागरिकांची एक ओळख बनलं आहे आणि जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आलं आहे.  बहुतांश नागरिकांनी आधार-पॅन लिंक केलं मात्र, अद्यापही काही नागरिकांनी अधार-पॅन लिंक केलेलं नाहीये. अशा नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे कारण आधार - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवली आहे.

आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारिख ३० सप्टेंबर २०१९ ठेवण्यात आली होती. मात्र, आज (२८ सप्टेंबर) अर्थ मंत्रालयाने एक नोटिफिकेशन काढत आधार-पॅन लिंकिंगची तारीख वाढवली आहे. आता ही तारीख ३१ डिसेंबर २०१९ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत आपले आधार-पॅन लिंक केलेलं नाहीये अशा नागरिकांनी तात्काळ आपले आधार-पॅन लिंक करुन घ्या. 

आधार-पॅन लिंक न झाल्यास काय होईल?

आयकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकांसोबत लिंक करणं अनिवार्य केलं आहे. आधार-पॅन लिंक न झाल्यास काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तुमचं आधार-पॅन लिंक न झाल्यास तुमचे हे दोन्ही डॉक्युमेंट्स निष्क्रिय होतील. म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अवैध ठरतील.

कसं करावं आधार - पॅन लिंक?

  1. आधार-पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम e-filing website www.incometaxindiaefiling.gov.in या साईटला भेट द्या. 
  2. त्यानंतर या वेबसाइटच्या डाव्या बाजुला 'Link Aadhaar' हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. मग तुमच्यासमोर एक नवी विंडो ओपन होईल. 
  3. या विंडोमध्ये तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव टाईप करा.
  4. त्यानंतर कॅप्चा कोड इंटर करा किंवा OTP चा पर्याय उपलब्ध असेल तो निवडा.
  5. मग तुमच्या मोबाइल क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल तो ओटीपी बॉक्समध्ये इंटर करा.
  6. शेवटी 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुमचं आधार-पॅन एकमेकांसोबत लिंक होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी