IEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल

Anil Agarwal : देशातील आघाडीचे उद्योगपती आणि वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Agarwal, Chairman Vedanta Group) यांनी देशातील सद्यस्थिती, रोजगार, जागतिक कंपन्यांचे भारताबद्दल मत यावर आपले मत व्यक्त केले आहे. टाइम्स समूहाद्वारे (Times Group)आयोजित करण्यात आलेल्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022 (India Economic Conclave 2022) मध्ये अनिल अगरवाल बोलत होते. गरिबी, रोजगार निर्मिती, ऊर्जा, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर अगरवाल यांनी भाष्य केले.

Anil Agarwal at India Economic Conclave 2022
इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022मध्ये बोलताना वेदांताचे अनिल अगरवाल 
थोडं पण कामाचं
  • इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' कार्यक्रमात अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
  • मोहम्मद रफीचे गाणेही त्यांनी गायले.
  • आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Anil Agarwal at India Economic Conclave 2022 : मुंबई : देशातील आघाडीचे उद्योगपती आणि वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Agarwal, Chairman Vedanta Group) यांनी देशातील सद्यस्थिती, रोजगार, जागतिक कंपन्यांचे भारताबद्दल मत यावर आपले मत व्यक्त केले आहे. टाइम्स समूहाद्वारे (Times Group)आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) मध्ये अनिल अगरवाल बोलत होते. यावेळी त्यांनी 'इंडिया: इंजिन ऑफ ग्लोबल ग्रोथ' या विषयावर टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादिका आणि टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादिका नाविका कुमार (Navika Kumar) यांच्याशी बोलताना आपली मते व्यक्त केली. (Anil Agarwal, Chairman Vedanta Group, spoke about various topics at India Economic Conclave 2022)

अधिक वाचा : IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप

जगाचे लक्ष भारताकडे

अनिल अग्रवाल म्हणाले की, 'आपण मोठी स्वप्ने पाहतो मात्र ती पूर्ण कशी होईल हे आपण पाहत नाही. आज भारत भूराजकीय परिस्थितीत मोठी भूमिका बजावत आहे. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे युद्ध कसे थांबेल यासाठी त्यांच्याकडे  पुन्हा पुन्हा पाहिले जाते आहे. ते म्हणाले, 'मी इंग्लंडमध्ये 22 वर्षे राहिलो आहे आणि मी पाहिले आहे की भारताकडे संपूर्ण जग पाहते आहे. भारत व्यवसायाचे पर्यायी ठिकाण म्हणून कसे उदयास आले आहे.

अधिक वाचा : IEC 2022 | 5G स्पेक्ट्रम दर कमी असावेत, भारती एअरटेलच्या सुनील मित्तलांचे मत

जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय आघाडीवर 

अग्रवाल पुढे म्हणाले, 'जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय करतात. भारतीय ही त्यांची पहिली पसंती आहे. जगातील कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीचा CFO भारतीय असेल तर त्याच्या शेअरची किंमत वाढते. जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय नेतृत्व असताना भारतीय कंपन्यांना भारतीय सीईओ का चालवू शकत नाहीत? इसवी सन 1200-1400 मध्ये भारताचा जीडीपी जगात सर्वाधिक होता. आम्ही कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. आम्ही नेहमीच शांतता प्रिय आहोत. मात्र आमच्या सहनशीलतेला मर्यादा आहे.

अधिक वाचा : ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढ्या नागरिकांचे भारतात एका दिवसांत लसीकरण : अनुराग ठाकुर

गरिबी हटवून रोजगार वाढवणे महत्त्वाचे 

गरीबी आणि रोजगारासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अग्रवाल म्हणाले की मोदीजी म्हणाले होते की, आज आपल्याकडे असे काहीही नाही जे आपण बनवू शकत नाही. आपल्याकडे सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे. भारतात पोटॅश, तांबे आणि खतांचा सर्वात मोठा साठा आहे. शेअर बाजारात बँकांसह 200 सरकारी कंपन्या सूचीबद्ध आहेत. माझ्या दृष्टीने गरिबी हटवणे आणि रोजगार वाढवणे महत्त्वाचे आहे.

आपण तेल आणि वायूचे उत्पादन करावे असे जगाला वाटत नाही

भारत 80-85% ऊर्जा आयात करतो. आपण कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन करावे असे जगाला वाटत नाही. आपण ते आयात करावे अशीच जगाची इच्छा आहे. इतर देश ते 10 डॉलर मध्ये बनवून ते आपल्याला 110 डॉलर मध्ये विकतात. आमच्याकडे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा 300 अब्ज बॅरलचा साठा आहे. एकट्या वेदांताने मागील 6 वर्षांत 3,60,000 कोटी रुपयांचा कर भरला आहे, अशी माहिती अनिल अगरवाल यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी