New Rules From January 2022 :भारतात १ जानेवारी २०२२ पासून होणार सात मोठे बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

New Rules From January 2022 in India : भारतात १ जानेवारी २०२२ पासून सात मोठे बदल होणार आहेत. यात LPG सिलेंडरचे दर, मारुती कारचे दर, ATM मधून पैसे काढण्याचे नियम, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, रेल्वे रिझर्व्हेशन यांच्याशी संबंधित बदल आहेत.

big changes will be implemented in the country from January 1
भारतात १ जानेवारी २०२२ पासून होणार सात मोठे बदल 
थोडं पण कामाचं
  • भारतात १ जानेवारी २०२२ पासून होणार सात मोठे बदल
  • जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान
  • LPG गॅस सिलेंडरचे दर बदलणार, मारुती कार आणि व्यावसायिक वाहने महागणार

big changes will be implemented in the country from January 1 know otherwise there will be loss : भारतात १ जानेवारी २०२२ पासून सात मोठे बदल होणार आहेत. हे बदल जाणून घेतले नाही तर आपले नुकसान होऊ शकते. यामुळे बदलांविषयी जाणून घ्या...

  1. LPG गॅस सिलेंडरचे दर बदलणार - देशातील तेल कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या दरांचा आढावा घेणार आहेत. मागणी-पुरवठा समीकरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, डॉलर-रुपया विनिमयाचा दर अशा वेगवेगळ्या निकषांचा एकत्रित आढावा घेऊन त्या आधारे सिलेंडरचे दर निश्चित केले जातील. प्रत्येक राज्याच्या कर धोरणानुसार सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. नवे दर नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये जाहीर होतील.
  2. महागणार मारुती कार - नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये मारुती सुझुकी कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. कोरोना संकटामुळे झालेले नुकसान तसेच सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती, स्टील आणि अॅल्युमिनियमचे वाढलेले दर, वाहन निर्मितीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीने जानेवारी २०२२ पासून मारुती सुझुकी कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे.
  3. व्यावसायिक वाहने महागणार - टाटा मोटर्स कंपनी २०२२ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या दरांमध्ये वाढ करणार आहे. वाहनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या, धातुच्या तसेच सुट्या भागांच्या दरात वाढ झाल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या दरांमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. व्यावसायिक वाहनांच्या दरांमध्ये किमान अडीच टक्क्यांची वाढ होणार आहे.
  4. ATM मधून पैसे काढणे होणार खर्चिक - एक जानेवारी २०२२ पासून नागरिकांना एटीएममधून विनामूल्य पैसे काढण्याच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास प्रत्येकवेळी अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. नियमानुसार स्वतःच्या बँकेतून पाच वेळा पैसे काढण्यासाठी कोणताही दर आकारला जात नाही. तसेच प्रमुख शहरांमध्ये (मेट्रो सिटी) अन्य बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणताही दर आकारला जात नाही. इतर शहरांमध्ये (नॉन मेट्रो सिटी) अन्य बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्यासाठी कोणताही दर आकारला जात नाही. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येकवेळी एटीएममधून पैसे काढताच ग्राहकाला २० रुपये आकारले जातात. आता ही रक्कम २१ रुपये होईल. 
  5. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक - १ जानेवारी २०२२ पासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एकावेळी मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करणे अथवा काढणे यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत बेसिक सेव्हिंगमधून दर चार महिन्यांत एकदा पैसे काढता येतात. मर्यादेचे उल्लंघन करुन पैसे काढल्यास, काढलेल्या पैशांच्या ०.५० टक्के एवढे पैसे मोजावे लागतील.
  6. डेबिट आणि क्रेडिट कार्ड - प्रत्येकवेळी ऑनलाइन खरेदी करताना स्वतःच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाशी संबंधित सर्व माहिती नव्याने द्यावी लागेल. कार्डाशी संबंधित माहिती कोणत्याही ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स वेबसाइट येथे सेव्ह केली जाणार नाही. 
  7. रेल्वे रिझर्व्हेशन - आयत्यावेळी रेल्वे खिडकीतून अनारक्षित तिकीट खरेदी करुन लांब पल्ल्याच्या गाडीतील सामान्य बोगीतून प्रवास करता येईल. ही सुविधा २०२२ मध्ये सुरुवातीला २० लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दिली जाईल. लवकरच आणखी गाड्यांमधूनही हा पर्याय उपलब्ध होईल. कोरोना संकटाला सुरुवात होण्याआधी ही सेवा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून अस्तित्वात होती. मात्र कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून ही सेवा काही महिने बंद केली होती. आता पुन्हा ही सेवा सुरू होत आहे. मात्र हा रेल्वे प्रवास करू इच्छिणाऱ्याकडे योग्य तिकिट तसेच कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी