Petrol Diesel Price: बजेटमुळे 'इतक्या' रुपयांनी महगणार पेट्रोल-डिझेल, मध्यरात्रीपासून लागू होणार नवे दर

काम-धंदा
Updated Jul 05, 2019 | 19:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Petrol Diesel costlier: मोदी सरकार 2.0 चं पहिलं बजेट सादर करण्यात आलं. या बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी आणि सेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इंधन दरांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

Petrol Diesel costlier
बजेटमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात 'इतक्या' रुपयांनी होणार वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकार 2.0 चं पहिलं बजेट नुकतचं सादर करण्यात आलं. या बजेटमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेल संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी आणि रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामाध्यमातून एक-एक रुपये वाढ करण्याचं जाहीर केलं आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी वाढ होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा होत्या त्याच दरावर पोहोचणार आहेत ज्या ऑक्टोबर 2018 मध्ये होत्या. त्यानंतर अनेक राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील शुल्क 1.50 रुपयांनी कपात केली होती. तर आता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि सेस मध्ये एक-एक रुपयांची वाढ करण्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दारत दोन रुपयांनी वाढ होणार आहे.

आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या सामान्य नागरिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. इंधनावर लागू करण्यात येणाऱ्या या अतिरिक्त करामुळे पेट्रोल-डिझेल खूपच महाग होईल. इंधन दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम इतर वस्तूंवरही होईल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.

दिल्लीमध्ये सध्या पेट्रोलचा दर 70.51 रुपये प्रति लिटर इतका आहे. ज्यामध्ये खरेदीदार 36.40 रुपये विविध कर आणि डीलरचं कमीशन म्हणून देतात. त्यापैकी 17.98 रुपये एक्साइज ड्युटी असते तर 3.54 रुपये डीलरचं कमीशन असतं. यासोबतच 14.98 रुपये वॅट लागतो. अर्थमंत्र्यांनी आज केलेल्या घोषणेनंतर या करांमध्ये दोन रुपयांनी वाढ होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या बजेटमधील भाषणात म्हटलं की, अतिरिक्त उत्पादन जोडण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. कच्च्या तेलाची किंमत कमी आहे या स्थितीमुळे पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि सेस लावण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी